कै.संदीप अश्रुबा आंधळे यांच्या वारसास 10,00,000/-किमतीचा धनादेश नागेबाबा मल्टिस्टेटच्या वतीने शाखेचे खातेदार व मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्त श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को ऑप संस्था
Co-op Credit Societies

श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को ऑप संस्था सुरक्षा कवच योजना सभासदांना आपुलकीचे सहकार्य

नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचा धनादेश प्रदान.

Banco India

श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को ऑप संस्था वर्षभर ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात काम न करता समाजासाठी काहीतरी योगदान देण्याच्या उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक व सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत आहे. संस्थेतील प्रत्येक सभासद हा आपल्या परिवाराचा घटक आहे. याचा विचार करून संस्थेतील सभासदांसाठी नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजना सुरू केली आहे; ज्यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास सभासदांच्या वारसांना 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते तसेच अपघात झाल्यास 5 लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटल खर्च दिला जातो. या योजनेतून त्या कुटुंबाला खरा आधार देण्याचे काम संस्था करत आहे.

श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट कडा शाखेचे खातेदार सभासद कै. संदीप अश्रुबा आंधळे यांचे मागील काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. त्यांनी नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत नाव नोंदणी केलेली होती. आज त्यांच्या वारसास 10,00,000/- अक्षरी दहा लाख रुपये किमतीचा धनादेश नागेबाबा मल्टिस्टेटच्या वतीने शाखेचे खातेदार व मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आला. कै. संदीप आंधळे यांच्या मागे पत्नी विद्या आंधळे, दोन लहान मुली, आई-वडील असे कुटुंब आहे.

यावेळी  ह.भ.प.विष्णू महाराज आंधळे, लिंडोबी ग्रामपंचायतचे सरपंच  CA अनिकेत आंधळे  मा. सरपंच समाधान आंधळे, मा. सभापती बाबासाहेब आंधळे, गोरख आंधळे, शिवाजी आंधळे,  व इतर ग्रामस्थ, नागेबाबा परिवारातील सदस्य राजूभाऊ चिंधे, राऊत रेवणनाथ, नितिन घोडके, आशिष शिंदे, प्रवीण राख उपस्थित होते तसेच नागेबाबा मल्टीस्टेट कडा शाखेचे पालक अधिकारी देविदास कदम, सुरक्षा कवच अधिकारी योगिता पटारे, एरिया डेव्हलपमेंट ऑफिसर सचिन बोडखे, शाखाधिकारी वंजारे नवनाथ कर्डीले, लहू तांबे उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT