मराठा पतसंस्था शेवगावतर्फे आरोग्य चाचणी मराठा बिगरशेती सहकारी पतसंस्था, अहमदनगर
Co-op Credit Societies

शेवगाव येथे मराठा पतसंस्थेच्या आरोग्य शिबिराचे आयोजन

सहकार मंत्रालय स्थापना दिन व आषाढी एकादशी निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

बँको वृत्त सेवा

मराठा सेवा संघ अहिल्यानगर प्रणित मराठा पतसंस्था शेवगाव व जिजाऊ ब्रिगेड शेवगाव तालुका यांच्या संयुक्त विद्यामाने सहकार मंत्रालय स्थापना दिन व आषाढी एकादशी निमित्ताने  शेवगाव ते धाकटी पंढरी वरुर या ठिकाणी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे आयोजन करण्यासाठी पतसंस्थेचे संस्थापक विजय ठुबे यांनी मार्गदर्शन केले.

या शिबिरामध्ये मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवश्री विजय देशमुख तालुका उपाध्यक्ष विष्णू घनवट संभाजी ब्रिगेडचे निलेश बोरुडे शरद जोशी तालुका गट विकास अधिकारी पाटेकर साहेब त्याच बरोबर मराठा पतसंस्थेचे सर्व कर्मचारी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष डॉक्टर शितल देवडे सह दहा नामांकित डॉक्टर टीम यांच्याकडून सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जाणाऱ्या सर्व जेष्ठ नागरिक त्याचबरोबर लहान व थोरांचे हिमोग्लोबिन रक्तदाब सांधेदुखी त्वचा समस्या केस समस्या यासारख्या अनेक आजारावरच्या चाचण्या मोफत स्वरूपामध्ये करून देण्यात आल्या तसेच या सर्व भाविकांना अल्पोपहार म्हणून केळीचे वाटप ही करण्यात आले या शिबिरास शेवगाव तालुक्याचे माजी आमदार चंद्रशेखर घुले तसेच शेवगावचे जेष्ठ नागरिक अरुण पाटील लांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली व आभार व्यक्त केले.

SCROLL FOR NEXT