मानसी महिला पतसंस्थेची २२ वी वार्षिक सभा उत्साहात  मानसी महिला नागरी सहकारी पतसंस्था पैठण ,छत्रपति संभाजी नगर
Co-op Credit Societies

मानसी महिला पतसंस्थेची वार्षिक सभा: आर्थिक प्रगती आणि नफा

मानसी महिला पतसंस्थेला अहवाल वर्षात 38 लाख 59 हजार रुपये नफा

बँको वृत्त सेवा

मानसी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पैठण, छत्रपति संभाजी नगर या संस्थेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आशिर्वाद मंगल कार्यालय पैठण येथे संस्थेच्या अध्यक्षा सौ संगीता देवेंद्र इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. पन्नास कोटी व्यवसाय, 28 कोटी ठेवी, 21 कोटी येणे कर्ज, 11 गुंतवणूक, 2.5 कोटी, वसुल भागभांडवल, असलेल्या मानसी महिला पतसंस्थेला अहवाल वर्षात 38 लाख 59 हजार रुपये नफा झाल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

सभेत आर्थिक पत्रकांना मंजुरी, भागधारकांना नऊ टक्के लाभांश, यासह स्वमालकीची जागा, ऑफीस खरेदी करणेबाबत ठराव सर्वानुमते मंजूर झाले. श्री श्रीकांत पातकळ यांना ऊत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार २०२५ देण्यात आला. तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचे भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले व नियमित कर्ज परतफेड करणा-या सभासदांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्हाईस चेअरमन सौ अश्विनी गणेश मडके, संचालिका, सौ शिला संतोष तांबे, सौ आरती नरेश कावसानकर, सौ अर्चना गिरवलकर, सौ पार्वती लक्ष्मण दारूणकर,सौ रजनी अनंत शेवतेकर,सौ सुनिता हीरालाल देवकर, सौ राधिका रमेश कुलकर्णी, कु साक्षी उल्हास बेतवार,सौ दक्षा स्वप्निल श्रॉफ सौ प्रणिता कृष्णनाथ मुळे, सौ रश्मी हेमंत कडेठाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मानसी महिला पतसंस्थेचे कार्यक्षेत्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा असून पैठण आणि छत्रपती संभाजीनगर दोन शाखा आहेत. संस्थेला प्रत्येक वर्षी राज्य स्तरीय पुरस्कार मिळाले असून लेखापरीक्षणात सातत्याने अ वर्ग मिळत आहे. सभेच्या यशस्वीतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी देवेश इनामदार, व्यवस्थापक, कृष्णनाथ मुळे, संजय उपाध्ये, व  विजय औटे, महेश भुसारे, राहुल राजेभोसले, मोहिनी देशपांडे, श्रीकांत पातकळ, सुशील कुलकर्णी, सुनिल चन्ने, संदीप जमधडे, अनिल तोतला, सुधीर अपरंपार, सचिन पोटे यांनी परिश्रम घेतले.

SCROLL FOR NEXT