कोडोली मर्चंट पतसंस्थेची वार्षिक सभा उपस्थित मान्यवर  कोडोली मर्चंट सहकारी पतसंस्था
Co-op Credit Societies

कोडोली मर्चंट पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात सपंन्न

कोडोली मर्चंट सहकारी पतसंस्था

Reva Kulkarni

कोडोली येथील मर्चंट सहकारी पतसंस्थेस ११ लाख तर प्रदीप पाटील कर्मचारी सोसायटीस १६ लाख ७० हजारांचा नफा झाला असून दोन्ही संस्थेस ऑडिट वर्ग अ च दर्जा मिळाला आहे. दोन्ही संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा विघ्नहर्ता हॉलमध्ये पार पडली.

कोडोली मर्चंट पतसंस्थेची वार्षिक सभा उपस्थित मान्यवर

सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. मिलिंद गोडबोले होते. कोडोली मर्चंट पतसंस्थेच्या १२ कोटी ठेवी असून ८ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.तर कर्मचारी क्रेडिट सोसायटीकडे १७ कोटी ठेवी आहेत. तसेच  डॉ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे अध्यक्ष पाटील आणि सुभाष जद यांनी सांगितले. मर्चंट संस्थेचे अहवाल वाचन सचिव विजय जाधव यांनी तर कर्मचारी क्रेडिट सोसायटीचे अहवाल वाचन पुंडलिक पाटील यांनी केले. राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन  तर मंदार पसरणीकर यांनी आभार मानले.  

SCROLL FOR NEXT