कर्मवीर पतसंस्थेची ३८ वी वार्षिक सभा कर्जे, भागभांडवल, यात पाचपटीने वाढ कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था
Co-op Credit Societies

कर्मवीर पतसंस्थेची वार्षिक सभा: सभासदांना १५% लाभांशाची घोषणा

कर्मवीर भाऊराव पाटील नागरी पतसंस्था सांगली, ३८ वी वार्षिक सभा : कर्जे, भागभांडवल, यात पाचपटीने वाढ

बँको वृत्त सेवा

कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली ची सन २०२४- २०२५ सालची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. आर्थिक वर्ष २०२४ - २०२५ साठी सभासदांना १५ % ने लाभांष देणार असल्याची घोषणा संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केली. या घोषणेचे सभासदांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. सभेची सुरुवात संस्थेचे श्रध्दास्थान कर्मवीर भाऊराव पाटील व स्व. डॉ.आप्पासाहेब चोपडे यांचे प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे यांनी श्रध्दांजली ठरावाचे वाचन केले.त्यावेळी दिवंगताना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रध्दांजली वाहणेत आली.

आजच्या सभेचे स्वागत, प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. कर्मवीर पतसंस्थेने सभासदांच्या विश्वासावर चांगली कामगिरी नोंदविली आहे, त्याचे श्रेय सभासद संचालक, सेवक यांच्या सांधिक कार्यास दिले व सभासदांना मनपुर्वक धन्यवाद दिले. संस्थेच्या भक्कम आर्थिक स्थितीचा सविस्तर आढावा त्यांनी सभासदांसमोर जाहिर केला. संस्थेची प्रगती उल्लेखनिय असून जादा तरतुदीमुळे संस्थेचा ताळेबंद मजबुत झाला आहे असे त्यांनी सांगितले. सभासदांनी संस्थेवर आजवर केलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी सभासदांना धन्यवाद दिले. यापुढेही सभासदांनी संस्थेच्या कार्यास पाठबळ देण्याचे आवाहन श्री. रावसाहेब पाटील यांनी केले. मागील ५ वर्षात त्यांच्या चेअरमन पदाच्या कालवधीत संस्थेने केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी सभासदांच्या पुढे ठेवला. ठेवी, कर्जे,भागभांडवल, स्वनिधी, गुंतवणुक, खेळते भांडवल यामध्ये झालेली वाढ त्यांनी सभेपुढे मांडली. यासर्वामध्ये पाचपटीने वाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सेवकांच्या पगारामध्ये तिप्पट वाढ केली त्यामुळे सर्व सेवक समाधानी आहेत. आजच १५ टक्के लाभांषाच्या रुपाने रुपये ५ कोटी ७८ लाखापेक्षा अधिक रक्कम सभासदांच्या सेव्हींग खात्यास वर्ग होवून सभा सुरु असतानाच त्याचा मेसेज सभासदांना प्राप्त झाला. त्याबद्दल सभासदांनी संस्थेच्या तत्परसेवेचे कौतूक होत आहे. सभेच्या विषय पत्रिकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम यांनी केले. सर्व विषय सभासदांनी एक मताने मंजूर केले. त्यांनी संस्थेची सांपत्तिक स्थिती सविस्तर विषद केली. संस्थेच्या वाढीची आकडेवारीसह माहिती त्यांनी सभेपुढे प्रस्तुत केली. सर्वच बाबतीत संस्थेने २० टक्केहून अधिक वाढीचा रेशो साध्य केल्याचे त्यांनी सांगितले. अधिकृत भागभांडवल, जयसिंगपूर शाखेस जागा खरेदी, नविन शाखा विस्तारासह संस्थेच्या अंदाजपत्रकास सभासदांनी मंजुरी दिली. सभासदांनी कां ही चांगल्या सुचना केल्यात्या स्वीकारण्यात आल्या. ६४ शाखातून संस्था कार्यरत आहे. सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेस व्हाईस चेअरमन डॉ.अशोक आण्णा सकळे उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT