कल्याणी महिला पतसंस्थेतर्फे महिलांसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण  मोनाली फॅशन डिझाईन या संस्थेचे श्री. बोरनारे सर
Co-op Credit Societies

कल्याणी महिला पतसंस्थेतर्फे महिलांसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण

महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या हेतूने मोफत टेलरिंग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

Reva Kulkarni

कल्याणी नागरी महिला सहकारी पतसंस्था मर्यादित , नाशिक, आणि सहकार उद्यमी अंतर्गत कल्याणी उद्योग सेवा केंद्र यांच्यामार्फत नाशिकमधील महिलांसाठी मोफत टेलरिंग महिला प्रशिक्षण कार्यशाळा शनिवार दिनांक 26 जुलै २०२५ रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत आयोजित करण्यात आली होती. नाशिकमधील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या हेतूने मोफत टेलरिंग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महिलांना टेलरिंगचे मूलभूत ज्ञान तसेच ब्लाऊज कटिंगची प्रात्यक्षिके (Demo) दाखवण्यात आली.

या कार्यशाळेस प्रशिक्षक म्हणून कोपरगाव येथील मोनाली फॅशन डिझाईन या संस्थेचे श्री. बोरनारे सर उपस्थित होते यावेळी टेलरिंगबाबत माहिती आणि ब्लाऊज कटिंग डेमो दाखवण्यात आला. महिलांनी स्वावलंबी व्हावे या हेतूने अनेक योजना, प्रशिक्षण कार्यक्रम , प्रदर्शन येत्या काळात कल्याणी उद्योग केंद्रामार्फत घेतले जाणार आहेत असे कल्याणी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा मा. ॲड.अंजलीताई पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी सुमारे महिला ४०उपस्थित होत्या.

SCROLL FOR NEXT