मुख्य कार्यालयाचा पत्ता: पहिला मजला, सिद्ध कस्तुरी चेंबर्स, मंत्री चांडक विहार, होटगी रोड, आसरा चौक, एस्सार पेट्रोल पंपामागे, सोलापूर
ई-मेल: mauliurban.credit@gmail.com
संस्थेबद्दल थोडक्यात:
माउली अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. ही संस्था सोलापूर जिल्ह्यात कार्यरत आहे. संस्थेच्या सोलापूर येथील मुख्य कार्यालय व सोलापूर येथीलच नवीन शाखेसाठी खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
मॅनेजर – १
या पदासाठी B.Com / M.Com / CA / कोणतीही पदवी असलेले उमेदवार पात्र आहेत. अर्जदारास अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी किंवा अर्बन बँकेत मॅनेजर म्हणून किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
कॅशिअर – १
या पदासाठी B.Com किंवा कोणतीही पदवी आवश्यक आहे. संबंधित पदाचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
क्लार्क – १
या पदासाठी B.Com किंवा कोणतीही पदवी असावी. अनुभव असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल.
जनसंपर्क क्लार्क – १
या पदासाठी कोणतीही पदवी आवश्यक आहे. तसेच उमेदवारास संगणक व सोशल मिडियाचा अनुभव आवश्यक आहे.
शिपाई (ऑफिस असिस्टंट) – १
या पदासाठी किमान १० वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
अतिरिक्त आवश्यक पात्रता: पद क्रमांक १ ते ३ साठी संगणक ज्ञान आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा : इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज (बायोडाटा, फोटो, शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रे, मोबाईल नंबर व ई-मेल) जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत खालील ई-मेल आयडीवर online पद्धतीने पाठवावा.
mauliurban.credit@gmail.com
अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9763444410
9763444410
शासनाच्या नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
चेअरमन: सीए व्ही. पी. पाटील व्हाईस चेअरमन: डॉ. शैलेश पाटील