धनश्री महिला पतसंस्थेच्या वार्षिक सभेत ५% लाभांश जाहीर धनश्री महिला पतसंस्था,मंगळवेढा,सोलापूर
Co-op Credit Societies

धनश्री महिला पतसंस्थेच्या वार्षिक सभेत ११% लाभांशाची घोषणा

सभासदांचा विश्वास हीच धनश्री महिला पतसंस्थेची खरी ताकद.

Reva Kulkarni

वीरशैव मंगल कार्यालय मंगळवेढा येथे धनश्री महिला पतसंस्थेची २९वी, धनश्री मल्टिस्टेटची १४ वी आणि सद्गुरू सीताराम महाराज अर्बन सोसायटीची ३ री वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेच्या चेअरमन  प्रा. शोभाताई काळुंगे होत्या. यावेळी प्रा. काळुंगे म्हणाल्या, शाखेच्या बऱ्याच ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीच्या वास्तू उभारणीचे काम अभिमानाने सुरु आहे.याप्रसंगी धनश्री महिला पतसंस्थेच्या उत्कृष्ट खातेदारांचा सन्मान करण्यात आला. तसेच वर्षभर जास्त पिग्मी संकलन करणाऱ्या दोन्ही संस्थेतील प्रत्येकी ३ पिग्मी एजंटांचा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी सर्व सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंतक, धनश्री महिला पतसंस्थेचे शाखाधिकारी  व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार नितीन कदम व राणी उन्हाळे यांनी केले. धनश्री संस्थेची खरी ताकद तिचे सभासद आहेत. संस्थेत जवळपास १९०० कोटी ठेवी आहेत. संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळाले आहे. प्रा. शोभाताई काळुंगे म्हणाल्या, धनश्री परिवारातील दोन्ही संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळाबरोबरच सभासद, ठेवीदार, कर्जदार, गाहक व प्रामुख्याने तत्पर विनम्र,कार्यक्षम सेवा देणारे कर्मचारी वृंद यांचे मोलाचे योगदान आहे. स्पर्धेच्या युगातही संस्थेचे कर्मचारी सर्व कायदेशीर बाबी समजून घेऊन बँकेचे कामकाज करत आहेत. यावेळी धनश्री पतसंस्थेच्या सरव्यवस्थापीका सुनीता सावंत  यांनी वार्षिक अहवाल वाचून दाखवत सभासदांना ११% लाभांश जाहीर केला. संस्थेच्या ३१ मार्च २०२५ अखेर ७२२ कोटी लाख ठेवी आहेत.

याप्रसंगी धनश्री महिला पतसंस्थेच्या उत्कृष्ट खातेदारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सर्व सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंतक, धनश्री महिला पतसंस्थेचे शाखाधिकारी  व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार नितीन कदम व राणी उन्हाळे यांनी केले.

SCROLL FOR NEXT