‘बुलडाणा अर्बन क्रेडिटचा ४०वा स्थापना दिन विविध उपक्रमांनी साजरा ‘बुलडाणा अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटी लि.
Co-op Credit Societies

बुलडाणा अर्बन क्रेडिटचा ४०वा स्थापना दिन विविध उपक्रमांनी साजरा

मनोरंजनाला अग्रक्रम देत संस्थेचा विकास परिचय संपन्न

बँको वृत्त सेवा

‘बुलडाणा अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटी लि.ची ४० वर्षांची यशस्वी घोडदौड कर्मचारी वर्गाच्या अथक परिश्रमाने व ग्राहकांच्या विश्वासामुळे साध्य झाली आहे. संस्था यापुढेही ग्राहकांच्या उत्तम प्रतिसादाला साथ देत दर्जेदार सेवा व उत्कृष्ट संकल्पना राबवत राहील जेणेकरून ग्राहक हित साध्य होत संस्था आणखी नावारूपाला येईल. नुकताच ‘बुलडाणा अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटी लि. चा ४० वा स्थापना दिवस उत्साहात साजरा झाला. या निमित्त १९ ते २१ जून रोजी महाराष्ट्रभरातील १० ठिकाणांवर  दर्जेदार मराठी नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.

पुणे व मुंबई येथे ‘शिकायला गेलो एक “सातारा येथे ‘२ वाजून २ मिनिटांनी’ , कोल्हापूर व सांगली येथे ‘ठरता ठरता ठरेना’ तसेच बारामती व कराड येथे व.पू. काळेंवर आधारित वपुर्झा आणि जयसिंगपूर येथे गोष्ट इथे संपत नाही असे कार्यक्रम घेण्यात आले. यास बुलडाणा अर्बनच्या सर्व ग्राहक, सभासद व हितचिंतक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आजवरची ४० वर्षांची वाटचाल ही ग्राहकांचा व सभासदांचा संस्थेवरील असलेला विश्वास व साथ आहे आणि ती कायम राहील असे सांगून सर्वांचे आभार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिरीष देशपांडे यांनी मानले. या कार्यक्रमास बुलडाणा अर्बनच्या विभागीय व्यवस्थापिका सौ योगिनी पोकळे, सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT