अविज पब्लिकेशनतर्फे दरवर्षी प्रकाशित होणारा बँको संदर्भ ग्रंथ २०२६ चे २७ व्या आवृत्तीचे काम सध्या सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवर प्रसारित होणारी बँको संदर्भ ग्रंथ म्हणून २७ वर्षांपासून सहकारी बँकांसाठी एक विश्वसनीय संदर्भग्रंथ राहिला आहे. सहकारी संस्थांची दर्जेदार उपयुक्त माहिती आणि त्याला अनुसरून रोजनिशी अशी संरचना असणारा बँको संदर्भ ग्रंथ प्रत्येक संस्थेत उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. अविज पब्लिकेशनने नुकतेच यासंदर्भात माहिती देत सर्व सहकारी बँकांनी आपल्या संस्थेची वित्तीय स्थिती (३१ मार्च २०२५ पर्यंतची) बँकोने दिलेल्या विहित नमुन्यामध्ये भरून पाठवण्याबाबत आव्हान केले आहे
दरवर्षीप्रमाणे अविज पब्लिकेशन प्रत्येक सहकारी बँकेची माहिती या संदर्भ ग्रंथात कोणतेही शुल्क न आकारता प्रसिद्ध केली जाते. यात यामध्ये सहकारी बँकेचे नाव, पत्ता, वेबसाईट ई-मेल, आर्थिक स्थिती 31 मार्च 2025 तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नावे यांचा समावेश आहे. आपल्या सहकारी बँकेची माहिती वेळेत समाविष्ट करण्यासाठी २० ऑगस्ट २०२५ पर्यंत सदर फॉर्म भरून अविज पब्लिकेशनला पाठवावा.
अविज पब्लिकेशनने नुकतेच स्वताचे www.banco.news हे डिजिटल न्यूज पोर्टल सुरू केले आहे, जे सहकारी व आर्थिक क्षेत्राला समर्पित आहे. बँकेच्या घडामोडी, यशोगाथा व बातम्या या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यासाठी आग्रहपूर्वक मागवत आहेत आणि बँको न्यूज पोर्टलचा लाभ घेण्याची विनंती केली. पोर्टलवर सहकाराचा लेखाजोखा असेल जो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या संस्थेच्या जवळ नेईल. बँकांनी व पतसंस्थानी या व्यासपीठाचा वापर आपल्या संस्थेची ओळख देण्यासाठी करावा.