कोकण मर्कंटाईल को-ऑप बँक "सॅफ"मधून बाहेर कोकण मर्कंटाईल को-ऑप बँक
Co-op Banks

कोकण मर्कंटाईल बँकेची आर्थिक स्थिती मजबूत, एसएएफमधून यशस्वी बाहेर

१० वर्षांच्या अथक वाटचालीत नोंदवले उल्लेखनीय यश

बँको वृत्त सेवा

 महाराष्ट्रातील बहु-राज्यीय नागरी सहकारी बँक- कोकण मर्कंटाईल सहकारी बँकेने दहा वर्षांच्या कालानंतर आरबीआयच्या पर्यवेक्षी कृती चौकटीतून (एसएएफ) यशस्वीरित्या बाहेर पडून एक महत्वाचा टप्पा गाठलेला आहे. या बँकेने ३० जून २०२५ पर्यंत आपले निव्वळ एनपीए लक्षणीयरीत्या कमी केले आहेत आणि सर्व संचित तोटे पूर्णपणे पुसून टाकले आहेत. ज्यामुळे बँक मजबूत आर्थिक स्थितीकडे वाटचाल करीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

 बँकेच्या नवीनतम ऑडिट केलेल्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२५ पर्यंत बँकेचा निव्वळ एनपीए ४.३३% पर्यंत घसरला, जो आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये नोंदवलेल्या १०.२२% पेक्षा लक्षणीयरित्या सुधारलेला आहे.

 बँकेचे आर्थिक निर्देशांक सकारात्मक आणि स्थिर वाटचाल दर्शवतात. बँकेचा एकूण व्यवसाय १,३२१ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे, जो वार्षिक वाढीच्या तुलनेत ६.८९% आहे. त्याच वेळी, बँकेचे भांडवल जे जोखीम (भारित) मालमत्ता गुणोत्तर (CRAR) १७.०६% वर होते , जे ९% च्या नियामक आवश्यकतेपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे.

 बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १०.१९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून  खातेधारक आणि डिजिटल वापरकर्त्यांची वाढती संख्या यासह, कोकण बँकेने स्वतःला वाढीच्या मार्गावर दृढपणे उभे केले आहे. आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२५ पर्यंत ठेवी ८१३.०१ कोटी रुपये होत्या, तर कर्ज ५०८.६० कोटी रुपये होते. या उल्लेखनीय कामगिरीचे बरेचसे श्रेय दोन वर्षांपूर्वी पदभार स्वीकारणारे अध्यक्ष आसिफ दादन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला जाते.

 श्री. दादन म्हणाले, "आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, आम्ही केवळ SAF मधून बाहेर पडलेलो नाही तर मागील सर्व तोटेही भरून काढलेले आहेत आणि चांगला नफाही मिळवला आहे. भविष्यातही ही गती कायम ठेवण्याचा आमचा मानस आहे.  बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि गोवा येथे २५ शाखांद्वारे कार्यरत असलेली ही बँक आता २०२८ पर्यंत अनुसूचित सहकारी बँकेचा प्रतिष्ठित दर्जा मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे.."

 त्याच वेळी, बँकेच्या परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संचालक मंडळाने अकबर वाय. कोंडकरी यांची आरबीआयच्या मान्यतेने आणखी तीन वर्षांच्या कालावधीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती केली आहे आणि त्यांचा कार्यकाळ २०२८ पर्यंत वाढवला आहे.आधुनिक बँकिंग ट्रेंड्सच्या अनुषंगाने, कोकण बँक रुपे डेबिट कार्ड्स, एक समर्पित मोबाइल बँकिंग अॅप आणि यूपीआय लिंकेजसह आपला डिजिटल व्यवसाय वाढवत आहे, ज्यामुळे त्यांच्या वाढत्या ग्राहक वर्गाला अखंड आणि सुरक्षित बँकिंग सेवा मिळत आहेत.

SCROLL FOR NEXT