सर्व संचालकांनी संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहून ती यशस्वी करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.  तेलंगणा अर्बन को-ऑप बँक फेडरेशन
Co-op Banks

तेलंगणा अर्बन को-ऑप बँक फेडरेशनमध्ये ई. रामाराव यांची संचालक म्हणून नियुक्ती

पुस्तक प्रकाशन सोहळ्याचेही आयोजन

Pratap Patil

तेलंगणा अर्बन को-ऑप बँक फेडरेशनमध्ये आयोजित  बैठकीत स्थंभद्री अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष, श्री. ई. रामाराव यांची फेडरेशनच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली. श्री. ई. रामाराव यांच्या संचालक म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव अध्यक्ष श्री.  वेमिरेड्डी नरसिंहा रेड्डी गारु यांनी मांडला आणि तेलंगणा स्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेडचे कार्याध्यक्ष श्री. जी. मदन गोपाल स्वामी गारु यांनी त्याला अनुमोदन दिले. बैठकीचा समारोप अध्यक्षांना धन्यवाद देत करण्यात आला. संचालक मंडळाच्या बैठकीस १५ सदस्य उपस्थित होते. अजेंडामधील विषय सविस्तरपणे चर्चिले गेले आणि संचालकांनी चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला.

पुस्तक प्रकाशन सोहळा – यावेळी नवभारत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे आणि तेलंगणा फेडरेशनचे संचालक श्री. पांडुरंग राव गारु यांनी लिहिलेल्या Compendium of RBI Regulations UCBs – 2025 या पुस्तकाचे प्रकाशन अध्यक्ष श्री.  वेमिरेड्डी नरसिंहा रेड्डी गारु यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी या पुस्तकाचे  महत्व आणि उपयोगीता  स्पष्ट करून सदस्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.  या पुस्तकाच्या प्रती श्री. जी. मदन गोपाल स्वामी गारु आणि श्री. प्रमोदकुमार केडिया गारु यांना देण्यात आल्या. या कार्यक्रमाचा समारोप उपस्थितांनी  दिलेल्या जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादात झाला आणि श्री. पांडुरंग राव गारु यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले.

SCROLL FOR NEXT