रिझर्व्ह बँकेद्वारे नियंत्रित संस्थांच्या विरोधातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने रिझर्व्ह बँक एकीकृत लोकपाल योजना (आरबीआईओएस) बनवली असून या योजनेअंतर्गत तक्रार कशी नोंदवायची व त्याबद्दल माहिती कशी मिळवायची याबाबत पुढीलप्रमाणे प्रक्रिया पार पाडावयाची आहे.
रिझर्व्ह बँकेद्वारा नियंत्रित सर्व संस्थांना त्यांच्या ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी संस्था स्तरावर एक यंत्रणा असणे अनिवार्य केले गेले आहे, जिला संस्थेची अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा मानले जाते.
रिझर्व्ह बँक - एकीकृत लोकपाल योजना, २०२१ (आरबी-आईओएस) च्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेने आपल्या नियंत्रित संस्थाद्वारा प्रदान करण्यांत येत असलेल्या सेवांमधील कमतरतांशी संबंधित ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक जलद आणि निःशुल्क पर्यायी तक्रार निवारण यंत्रणा देखील स्थापन केली आहे.
तक्रार निवारण यंत्रणेअंतर्गत बँका, बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी), पेमेंट प्रणाली सहभागी (पीएसपी) आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआईसी) यांना नियंत्रित संस्था म्हणून गणले जाते.
आरबीआईओएस कोणत्याही नियंत्रित संस्थेविरुद्धच्या सर्व तक्रारींसाठी 'एक राष्ट्र एक लोकपाल' दृष्टिकोन स्वीकारते. त्यामुळे तक्रारदाराला हे ओळखणे आवश्यक नाही की त्याने/तिने कोणत्या लोकपाल योजना / कार्यालयांतर्गत लोकपालकडे तक्रार करावी.
आरबीआईओएसअंतर्गत समाविष्ट नसलेल्या नियंत्रित संस्थेविरुद्धच्या तक्रारींचे निवारण भारतीय रिझव्ह बँकेच्या ग्राहक शिक्षण आणि संरक्षण कक्ष (सीईपीसीज) द्वारा केले जाते.
आरबीआईओएस आणि सीईपीसीच्या कक्षेत समाविष्ट असलेल्या नियंत्रित संस्थांची यादी https://cms.rbi.org.in ला भेट देऊन प्राप्त करता येईल.
तक्रार करायची असल्यास काय करावे ?
तुम्ही नियंत्रित संस्थेच्या विरोधात तक्रार नियंत्रित संस्थेच्या शाखेत किंवा तक्रार निवारण पोर्टलवर किंवा वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने नोंदवू शकता. तक्रार नोंदविल्याची पोचपावती घ्या किंवा तक्रारीचा संदर्भ क्रमांक जतन करा.
आरबीआय लोकपालशी कधी संपर्क साधावा?
तुम्ही खालील बाबतीत आरबीआई लोकपालकडे संपर्क साधू शकता:
३० दिवसांच्या आत नियंत्रित संस्थेकडून कोणतेही उत्तर प्राप्त न झाल्यास नियंत्रित संस्थेकडे केलेल्या तुमच्या तक्रारीच्या तारखेपासून एक वर्ष आणि एक महिन्याच्या आत कधीही.
नियंत्रित संस्थेकडून प्राप्त झालेले उत्तर असमाधानकारक असल्यास नियंत्रित संस्थेकडून उत्तर मिळाल्यानंतर एक वर्षाच्या आत कधीही.
टीप:
तक्रारीमध्ये आरबी-आईओएसमध्ये विहित केलेल्या तक्रार प्रपत्रानुसार सर्व आवश्यक तपशील /माहिती असावी.
तक्रार इतर कोणत्याही मंचावर (जसे की न्यायालये) किंवा आरबीआय लोकपालने यापूर्वी हाताळलेली नसावी / प्रलंबित नसावी.
नियंत्रित संस्थेकडे न जाता थेट आरबीआय लोकपालकडे तक्रार दाखल केल्याने ती नाकारली जाऊ शकते.
आरबीआईकडे तक्रार कशी नोंदवायची ?
नियंत्रित संस्थांविरुद्ध तक्रार खालीलपैकी कोणत्याही पद्धतीद्वारे दाखल केली जाऊ शकते:
https://cms.rbi.org.in येथे आरबीआईच्या तक्रार व्यवस्थापन प्रणाली (सीएमएस) पोर्टलद्वारे ऑनलाइन तक्रार केली जाऊ शकते
आरबीआईओएस मधील 'परिशिष्ट' मध्ये निर्दिष्ट केल्यानुसार वास्तविक स्वरूपात तक्रार (पत्र / टपाल द्वारा) 'केंद्रीकृत पावती आणि प्रक्रिया केंद्र. चौथा मजला, भारतीय रिझर्व्ह बँक सेक्टर-१७ सेंट्रल व्हिस्टा चंडीगढ़ १६० ०१७' येथे प्रेषित केली जाऊ शकते.
आरबीआईकडे तक्रार नोंदवण्याबद्दल अधिक माहिती कशी मिळवायची ?
अधिक माहितीसाठी, तुम्ही आरबीआईच्या संपर्क केंद्र सुविधेशी संपर्क साधू शकता. टोल-फ्री क्रमांक: १४४४८. इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम (आयव्हीआरएस) सह संपर्क केंद्र २४x७ उपलब्ध आहे, तर संपर्क केंद्राच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याची सुविधा राष्ट्रीय सुट्ट्या वगळता सोमवार ते शनिवार सकाळी ८:०० ते रात्री १०:०० दरम्यान इंग्रजी, हिंदी आणि दहा प्रादेशिक भाषांसाठी (आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तेलगू आणि तमिळ) उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी:
कृपया भेट द्या : आरबीआईओएस, २०२१ वर वारंवार विचारले जाणारे प्रश्न
https://www.rbl.org.in/scripts/FS FAQs.aspx?fn=2745
किंवा
सीएमएस पोर्टल - https://cms.rbi.org.in/
डीआईसीजीसी विरुद्ध तक्रारीसाठी सर्व सामान्य नागरिक खालील पत्त्यावर / ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवू शकतात)
निक्षेप, विना आणि क्रेडिट गॅरंटी निगम
महाव्यवस्थापक-
टीआयसीजीसी, तक्रार निवारण कक्ष.
भारतीय रिझर्व्ह बँक, दुसरा मजला