राजापूर अर्बन को-ऑप. बँक 
Co-op Banks

राजापूर अर्बन बँकेची AI सिस्टीम कार्यान्वित

अध्यक्ष श्री.संजय ओगले यांची घोषणा

बँको वृत्त सेवा

राजापूर: येथील राजापूर अर्बन को-ऑप. बँकेने ग्राहकांना सायबर धोक्यांपासून सुरक्षित सेवा प्रदान करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत असताना  बँकेने AI (Artificial Intelligence) सिस्टीम ही तांत्रिक सेवा नुकतीच सुरु केली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष श्री. संजय ओगले यांनी दिली. या तंत्रज्ञानाद्वारे बँकेच्या कर्जदारांना त्यांचे दर महिन्याचे कर्ज हफ्त्याकरीता रिमाइंडर कॉल आणि मेसेज जाणार आहेत.

या तंत्रज्ञानासाठी बँकेने AVS INSOTECH PVT.LTD या कंपनीसोबत करार केला असून याद्वारे बँकेच्या कर्जदारांना रिमाईंडर कॉल - मेसेजसोबतच ग्राहकांचा यावरील प्रतिसाद घेण्यात येणार असून ते कर्ज हफ्ता कधी भरणार आहेत? याचीदेखील डिजिटल पध्दतीने नोंद घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांनी कर्ज हफ्त्यासाठी दिलेल्या तारखेला त्यांना पुन्हा रिमाइंडर कॉल-मेसेज करण्यात येईल, सदरची सेवा देणारी सहकारी बँकांमध्ये राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि., राजापूर ही पहिलीच सहकारी बँक आहे, असे बँकेचे अध्यक्ष श्री. संजय ओगले म्हणाले.

SCROLL FOR NEXT