यशवंत सह. बँकेच्या व्हा.चेअरमनपदी दिलीप खाडे श्री यशवंत सहकारी बँक
Co-op Banks

दिलीप खाडे यांची यशवंत सह. बँकेच्या व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड

काटकसरीच्या, पारदर्शक कारभाराची दिली ग्वाही

Pratap Patil

कोल्हापूर जिल्ह्यातील कुडित्रे-कोपार्डे (ता. करवीर ) येथील श्री यशवंत सहकारी बँकेच्या व्हा. चेअरमनपदी दिलीप रंगराव खाडे (सांगरुळ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहाय्यक निबंधक श्री.युसुफ शेख होते.

सत्तारुढ गटांतर्गत नियोजनाप्रमाणे व्हा.चेअरमन भगवंत द. पाटील (वाकरे) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्तपदासाठी संचालक मंडळाच्या मंगळवारी (दि.२२) झालेल्या बैठकीत श्री. दिलीप रंगराव खाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. व्हा. चेअरमनपदासाठी श्री. खाडे यांचे नाव श्री.नंदकुमार पाटील यांनी सुचवले तर यासाठी अनुमोदन श्री. विश्वास पाटील यांनी दिले. यावेळी चेअरमन श्री. महेश पाटील-शिंगणापूरकर, माजी चेअरमन व विद्यमान संचालक ॲड. प्रकाश देसाई व तज्ञ संचालक अमर पाटील-शिंगणापूरकर यांची अभिनंदनपर भाषणे झाली. नूतन व्हा.चेअरमन दिलीप खाडे यांनी बिनविरोध निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन आपण सर्वांना विश्वासात घेवून काटकसरीचा व पारदर्शक कारभार करण्याची ग्वाही दिली.

यावेळी संचालक डी. के.पाटील, सर्जेराव शेलार, कुंडलिक पाटील, एकनाथ पाटील, हिंदूराव तोडकर, प्रल्हाद खाडे, एम.एस. पाटील, महेश पाटील, चंद्रकांत पाटील, कुलभुषण पाटील, बाबूराव रानगे, युवराज कांबळे, शोभा करपे, दत्तात्रय नाईक व बाजीराव देवाळकर उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पाटील यांनी आभार मानले.

SCROLL FOR NEXT