मुझफ्फरनगर: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष ठाकूर रामनाथ सिंह म्हणाले की, बँकेच्या दोन वर्षांतील कामगिरीची तुलना केली असता बँकेचा निव्वळ नफा ३१ मार्च २०२५ रोजी ११२७ लाखांवरून २०२२ लाखांवर पोहोचलेला आहे. २०२३ च्या तुलनेत खेळते भांडवलही ६१४ कोटींनी वाढलेले आहे. बँकेने मुख्यमंत्री युवा रोजगार योजना, युवा उद्यमी विकास अभियान अंतर्गत कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. गृह कर्जाची मर्यादा ३० लाखांवरून ७० लाखांपर्यंत वाढवली आहे.
सिंह पुढे म्हणाले की, बँक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी व शेतीच्या कामासाठी कर्ज देते. तसेच आता बँकेने राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणे दुचाकी, चारचाकी वाहनांसाठीही कर्ज देण्यास सुरुवात केलेली आहे. ते म्हणाले, बँकेच्या मुझफ्फरनगरमध्य ३९ शाखा आहेत, तर शामली जिल्ह्यात ११ शाखा आहेत. बँकेच्या बचत खातेदारांची संख्या साडेतीन लाख आहे. दोन वर्षांत शेतकऱ्यांना १००० कोटींचे कर्जवाटप केलेले आहे. सध्या बँकेच्या ठेवी २०५१ कोटींवरून २३३९ कोटींवर वाढल्या आहेत. ज्या उत्तर प्रदेशात प्रथम क्रमांकावर आहेत.
यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय समितीचे उपाध्यक्ष मुकेश जैन, संचालक मंडळ, बिजेंद्र मलिक, आशिष राठी, संजीव प्रधान, इंद्रपाल सिंग, दिनेश गोयल, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चौहान आदी उपस्थित होते.