जी एस महानगर को-ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी गीतांजलीताई शेळके उपाध्यक्षपदी भास्करराव कवाद  जी एस महानगर को-ऑप. बँक
Co-op Banks

जी एस महानगर बँकेच्या अध्यक्षपदी गीतांजलीताई शेळके यांची बिनविरोध निवड

भास्करराव कवाद उपाध्यक्षपदी; जी एस महानगर बँकेच्या नेतृत्वात नवीन दिशा

बँको वृत्त सेवा

मुंबई: जी एस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (शेड्युल्ड बँक) अध्यक्षपदी श्रीमती गीतांजलीताई उदयराव शेळके आणि उपाध्यक्षपदी श्री. भास्करराव बाबासाहेब कवाद यांची बिनविरोध निवड झाली. जी एस महानगर सहकारी बँक लि. मुंबई ही महाराष्ट्रात ७० शाखांद्वारे कार्यरत असलेली आणि ४,५०० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय असलेल्या प्रतिथयश बँकांपैकी एक बँक असून ग्राहकांचा विश्वास आणि पाठबळावर बँकेने प्रगतीचे नवनवे टप्पे गाठलेले आहेत.

श्रीमती गीतांजलीताई शेळके यांना बँकेच्या अध्यक्षपदी निवडले जाण्यामुळे बँकेच्या कार्यक्षमतेत नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बँक सशक्त आणि विकासशील होईल, अशी आशा बँकेच्या कर्मचार्‍यांनी व्यक्त केली. तर श्री. भास्करराव कवाद यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बँकेच्या प्रशासनात सुधारणा व कार्यक्षमता आणण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल बँकिंग क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

निवडीनंतर बँकेच्या नूतन पदाधिकार्‍यांनी सर्वांचे आभार मानले व आम्ही बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एकसंधपणे काम करणार असल्याचे म्हटले. यावेळी सौ. गीतांजलीताई शेळके यांनी “आम्ही सर्वांच्या सहकार्याने बँकेच्या कार्यक्षेत्रात नवीन उंची गाठू,” असे सांगितले. यावेळी बँकेचे सर्व संचालक,अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होता.

SCROLL FOR NEXT