कोल्हापूर | २० जून २०२५
बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) क्षेत्रातील माहितीचे विश्वसनीय व्यासपीठ म्हणून ओळख असलेल्या बँकोचे आजपासून बँको न्यूज पोर्टल (www.banco.news) या नव्या डिजिटल उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ झाला आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून सहकारी बँका, पतसंस्था, ग्रामीण आर्थिक संस्था, आर्थिक धोरणे, नियामक घडामोडी, तसेच डिजिटल फायनान्ससंबंधी ताज्या व विश्लेषणात्मक बातम्या वाचकांना एका क्लिकवर उपलब्ध होतील. या उपक्रमातून पारंपरिक सहकारी क्षेत्र व नवे डिजिटल माध्यम यांच्यातील दरी भरून काढण्याचा संकल्प बँको न्यूजने केला आहे.
बँकोचे संपादक आणि प्रकाशक श्री. अविनाश शिंत्रे- गुंडाळे म्हणाले,
"बँको न्यूज पोर्टल हे केवळ आमच्या मासिकाचे डिजिटल रूप नाही, तर ते BFSI क्षेत्रातील व्यावसायिक, संशोधक, धोरणनिर्माते आणि सहकारी नेत्यांसाठी दररोज मार्गदर्शक ठरणार आहे. या उपक्रमातून आम्ही ग्रामीण व नागरी सहकारी संस्थांचा आवाज देशपातळीवर पोहोचवणार आहोत."
या पोर्टलमध्ये सहकारी बँका, पतसंस्था, विमा, शेअर बाजार, डिजिटल बँकिंग, अर्थनीती, आरबीआय/सेबी परिपत्रके अशा विविध विभागांचा समावेश आहे. वाचकांना ताज्या घडामोडी, सखोल विश्लेषण, मुलाखती आणि धोरणात्मक लेख यांचाही लाभ मिळेल.
बँको न्यूज पोर्टलवर भेट देण्यासाठी लॉग ऑन करा – www.banco.news
पोर्टल मोबाइल आणि डेस्कटॉपवर सहजपणे उपलब्ध आहे. वाचकांना दररोजच्या अपडेटसाठी सबस्क्राइब करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.