श्रीपतरावदादा बँकेकडून १०० कोटी ठेवींचा टप्पा सर श्रीपतरावदादा सहकारी बँक
Co-op Banks

श्रीपतरावदादा बँकेने १०० कोटी ठेवींचा टप्पा गाठला, डिजिटल बँकिंगची तयारी

अध्यक्ष राजेश पाटील यांची माहिती

बँको वृत्त सेवा

दिवंगत आमदार पी. एन. पाटील (सडोलीकर) यांनी स्थापन केलेल्या श्रीपतरावदादा सहकारी बँकेने १०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला आहे. याबाबत माहिती देताना बँकेचे अध्यक्ष श्री. राजेश पाटील म्हणाले की,  १०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठने ही बँकेवरील असंख्य ग्राहकांच्या विश्वासाची पोहोचपावतीच आहे. यापुढे बँकेकडून डिजिटल  बँकिंग, मोबाईल ॲप आणि विविध ग्राहकसुलभ योजना राबवल्या जाणार आहेत.

सध्या बँकेकडे १०० कोटी ९४ लाख रुपयांच्या ठेवी असून, ६५ कोटी ३२ लाख रुपयांचे   कर्ज वाटप केलेले आहे. एकूण गुंतवणूक ५१ कोटी १० लाख रुपये असून, रिझर्व्ह फंड १५ कोटी ५७ लाख रुपये आहे.  बँकेच्या प्रगत वाटचालीत संचालक मंडळ, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व  बँकेच्या कर्मचारी वर्गाचे मोलाचे योगदान आहे.

दिवंगत पी. एन. पाटील यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेल्या या बँकेने विविध योजना राबवून सुशिक्षित बेरोजगारांपासून उद्योगपतीपर्यंत व शेतकऱ्यांनाही भक्कम आर्थिक आधार दिला आहे. बँकेच्या प्रगतीत  सभासद व ग्राहकांच्या अतूट विश्वासाचा वाटा असून, लवकरच  बँक २०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करेल, असे अध्यक्ष  पाटील यांनी  सांगितले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष गणपतराव पाटील, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. दिंडे उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT