मंचर येथील शरद सहकारी बँकेत शाखाधिकारी पदांसाठी भरती 
Job Opening

Sharad Sahakari Bank Ltd. मध्ये शाखाधिकारी पदांसाठी भरती

अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मार्च २०२६ - इच्छुक उमेदवारांनी अर्ज ई-मेलद्वारे पाठवावेत

Prachi Tadakhe

महाराष्ट्रातील सहकारी बँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या Sharad Sahakari Bank Ltd., मंचर या नागरी सहकारी बँकेने शाखाधिकारी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. बँकेचे मुख्य कार्यालय मंचर (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे असून बँकेच्या कार्यक्षेत्रात मुख्य कार्यालयासह २७ शाखा कार्यरत आहेत. सुमारे ३२०० कोटी रुपयांचा व्यवसाय असलेल्या या बँकेत सिनियर ऑफिसर (शाखाधिकारी) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

पदाची माहिती

  • पदाचे नाव: सिनियर ऑफिसर (शाखाधिकारी)

  • पदसंख्या:

  • वयोमर्यादा: ३० ते ४५ वर्षे (दि. १ जानेवारी २०२६ रोजी)

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच

  • MSCIT आवश्यक आहे.

  • JAIIB / CAIIB / GDC&A / MBA (Finance) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

आवश्यक अनुभव

या पदासाठी सहकारी, व्यापारी किंवा शेड्युल्ड बँकेत किमान ७ वर्षांचा अधिकारी पदाचा अनुभव आवश्यक आहे.
पर्यायी म्हणून पतसंस्थेत किमान १० वर्षांचा शाखाधिकारी पदाचा अनुभव असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

अर्जाबाबत महत्त्वाच्या सूचना

१) या पदासाठी पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करु शकतात.

२) वरील पदांसाठी संगणक ज्ञान असणे आवश्यक.

३) बँकेतून स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या उमेदवारांनी कृपया अर्ज करू नये.

४) शैक्षणिक पात्रता व बँकेतील अनुभव विचारात घेऊन त्यानुसार वयाच्या अटीत शिथिल करण्यात येईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मार्च २०२६ आहे.

अर्ज कसा कराल?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ई-मेलद्वारे पाठवायचा आहे.

ई-मेल: career@sharadbank.bank.in

प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

बँकेचा निर्णय अंतिम

भरती प्रक्रियेबाबतचा अंतिम निर्णय संचालक मंडळाचा राहील. तसेच नियम व अटींमध्ये आवश्यक बदल करण्याचा अधिकारही संचालक मंडळाकडे राहणार आहे.

SCROLL FOR NEXT