लातूर अर्बन को-ऑप. बँक 
Job Opening

लातूर अर्बन को-ऑप. बँकेत रोजगाराची संधी

सहकारी बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी; जालना शाखेसाठी थेट मुलाखतींचे आयोजन

Prachi Tadakhe

छत्रपती संभाजीनगर: सहकारी बँकिंग क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, लातूरच्या वतीने जालना येथील नियोजित नवीन शाखेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेचा एकूण व्यवसाय १४०० कोटींच्या टप्प्यावर असून, एकूण २४ शाखांच्या माध्यमातून बँक कार्यरत आहे. या विस्तार प्रक्रियेचा भाग म्हणून जालना शाखेसाठी सक्षम मनुष्यबळाची निवड करण्यासाठी सोमवार, दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी थेट मुलाखतींचे (Walk-in Interview) आयोजन करण्यात आले आहे.

या पदांसाठी होणार भरती:

बँकेच्या वतीने शाखा व्यवस्थापक, अधिकारी आणि लिपिक या तीन महत्त्वाच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

पात्रता आणि अनुभव:

  • शिक्षण: उमेदवार बी.कॉम (B.Com), एम.कॉम (M.Com) किंवा एमबीए (MBA) पदवीधारक असावा. तसेच सीए/आयसीडब्ल्यूए (इंटर) उत्तीर्ण किंवा 'जेएआयआयबी/सीएआयआयबी' (JAIIB/CAIIB) पूर्ण केलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाईल.

  • कौशल्य: उमेदवाराला संगणकाचे प्रभावी ज्ञान असणे अनिवार्य आहे. तसेच सहकारी बँकेतील कामाचा अनुभव असल्यास अशा उमेदवारांना निवडीत प्राधान्य देण्यात येईल.

मुलाखतीचा तपशील:

  • दिनांक: सोमवार, ६ एप्रिल २०२६

  • वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी २:०० पर्यंत.

  • स्थळ: लातूर अर्बन को-ऑप. बँक लि., 'रुचिका आर्केड', खडकेश्वर मंदिर समोर, खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर.

इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला येताना आपले अद्यावत बायोडाटा (Resume), पॅन कार्ड, आधार कार्डाची छायांकित प्रत आणि २ पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी श्री. रघुनाथ वट्टमवार (९८६०७०६९८९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बँकेच्या एच.आर.एम.एस. विभागामार्फत करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT