CEO ते मॅनेजर पदांसाठी संधी 
Job Opening

जनता सहकारी बँक,धाराशिवमध्ये मोठी भरती! CEO ते मॅनेजर पदांसाठी संधी

अनुभवी बँकिंग व्यावसायिकांना सुवर्णसंधी; 10 दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन

Prachi Tadakhe

धाराशिव येथील जनता सहकारी बँक लि. (मल्टी-स्टेट बँक) ने विविध वरिष्ठ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात 34 शाखांचे जाळे असलेल्या या बँकेचा एकूण व्यवसाय सुमारे ₹3,145 कोटी आहे. बँकिंग क्षेत्रातील अनुभवी आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

उपलब्ध पदे :

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) – 1 पद
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO) – 3 पदे
जनरल मॅनेजर – 4 पदे
मॅनेजर – 10 पदे

शैक्षणिक पात्रता:

उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून खालीलपैकी कोणतीही पात्रता असल्यास प्राधान्य दिले जाईल:

  • CAIIB / बँकिंग व फायनान्स डिप्लोमा

  • चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट अकाउंटंट

  • MBA (Finance)

  • कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी

अनुभवाची अट:

  • CEO/Deputy CEO साठी किमान 8 वर्षांचा मध्यम किंवा वरिष्ठ स्तरावरील बँकिंग अनुभव आवश्यक

  • जनरल मॅनेजर साठी किमान 15 वर्षांचा अनुभव

  • मॅनेजर साठी किमान 8 वर्षांचा अनुभव

डिजिटल बँकिंग, कोअर बँकिंग सोल्यूशन्स आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील अनुभव असल्यास अधिक प्राधान्य

इतर अटी:

  • CEO पदासाठी रिझर्व्ह बँकेच्या “Fit and Proper” निकषांची पूर्तता आवश्यक

  • नियुक्ती कालावधी सुरुवातीला 5 वर्षांचा असेल

  • कामगिरीनुसार आणि रिझर्व्ह बँक मंजुरीनुसार पुढील वाढ शक्य

अर्ज कसा कराल?

इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत खालील माध्यमातून अर्ज करावा:

पत्ता: सोलापूर रोड, धाराशिव – 413501

SCROLL FOR NEXT