बोरगांव: सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बोरगांव अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बोरगांव येथे विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक आणि लिपिक या पदांचा समावेश असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध शाखांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
१. पदाचे नाव: शाखा व्यवस्थापक
पदसंख्या: ०३
अनुभव: १ ते ३ वर्षे
ठिकाण: सानेगुरुजी, कळे, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, अब्दुललाट, दत्तवाड, आरग, गडहिंग्लज.
२. पदाचे नाव: सहाय्यक शाखा व्यवस्थापक
पदसंख्या: ०३
अनुभव: १ ते ३ वर्षे
ठिकाण: सानेगुरुजी, कळे, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, अब्दुललाट, दत्तवाड, आरग, गडहिंग्लज.
३. पदाचे नाव: क्लार्क (लिपिक)
पदसंख्या: ०६
अनुभव: १ ते ३ वर्षे (अनुभव नसल्यास फ्रेशर उमेदवारांनाही संधी)
ठिकाण: सानेगुरुजी, कळे, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, अब्दुललाट, दत्तवाड, आरग, गडहिंग्लज.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अद्ययावत अर्ज (Resume) आणि आवश्यक कागदपत्रे खालील पर्यायांचा वापर करून सादर करावीत:
ई-मेल: उमेदवारांनी आपले अर्ज ho@brgurb.in किंवा satishal@brgurb.in या ई-मेल आयडीवर पाठवावेत.
प्रत्यक्ष अर्ज: उमेदवार आपले अर्ज सोसायटीच्या मुख्य कार्यालयात (भादुले बिल्डिंग, बोरगांव इचलकरंजी रोड, बोरगांव - ५९१२१६) प्रत्यक्ष जमा करू शकतात.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
९५३८४२११२९
७४११५४२७६९
नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी सहकार क्षेत्रात करिअर करण्याची ही एक उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.