अमळनेर: बँकिंग क्षेत्रात अनुभवी असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रतिष्ठित आणि तब्बल १०० वर्षांची परंपरा असलेल्या दि अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि., अमळनेर येथे रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेने मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर या महत्त्वाच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
रिक्त पदांचा तपशील आणि पात्रता:
बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, खालील पदांसाठी भरती केली जाणार आहे:
१. पद: मॅनेजर
शैक्षणिक पात्रता: M.Com / B.Com / CA / CS / MBA (Finance) / Diploma in Banking / CAIIB / JAIIB
आवश्यक अनुभव: बँकिंग क्षेत्रातील किमान १० वर्षांचा अनुभव (कर्ज विभाग, वसुली, NPA व्यवस्थापन, SARFAESI ॲक्ट, ऑडिट इ.)
वयोमर्यादा: ३५ ते ५० वर्षे SARFAESI Act Expert Jobs
२. पद: असिस्टंट मॅनेजर
शैक्षणिक पात्रता: M.Com / B.Com / CA / CS / MBA (Finance) / Diploma in Banking / CAIIB / JAIIB
आवश्यक अनुभव: बँकिंग क्षेत्रातील किमान ५ वर्षांचा अनुभव (कर्ज, वसुली, रिझर्व्ह बँकेचे रिटर्न्स आणि ऑडिट इ.)
वयोमर्यादा: ३० ते ५० वर्षे
उमेदवाराला संगणकाचे ज्ञान (MS Office) असणे अनिवार्य आहे.
Core Banking Software हाताळण्याचा अनुभव असावा.
मराठी आणि इंग्रजी टायपिंगसह नेतृत्वगुण आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज आणि बायोडेटा (Resume/CV), पासपोर्ट साईज फोटोसह बँकेच्या मुख्य कार्यालयाला पाठवायचा आहे.
पत्ता: मुख्य कार्यालय - स्टेशन रोड, साने गुरुजी पुतळ्यासमोर, अमळनेर, जि. जळगाव - ४२५४०१.
ई-मेल: उमेदवारांनी अर्जात स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल नमूद करावा (बँकेचा ई-मेल: ceo@amalnerurbanbank.in किंवा admin@amalnerurbanbank.in).
पाकिटावर कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे, याचा स्पष्ट उल्लेख असावा. तसेच केवायसी (KYC) आणि अनुभवाच्या दाखल्याच्या प्रती स्व-साक्षांकित करून जोडाव्यात.
जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत अर्ज पोहोचणे आवश्यक आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी बँकेच्या https://amalnerurban.bank.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ०२५८७-२२२५८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.