आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे बँकिंग झपाट्याने बदलते आहे. बँकिंग रेग्युलेशन अॅक्टमधील व्याख्येस अनुसरून बँकिंग व्यवसायाचे मूलभूत तत्त्व जरी कायम असलेतरी बँकिंग व्यवसाय व बँकिंगबरोबर इतर सेवा पुरवण्याचे व्यवस्थेत या तंत्रज्ञानामध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. डी.डी., एम.टी., टीटी ही पेमेंट सिस्टिमची साधने काळाच्या पडद्याआड जाउन त्यांची जागा इसीएस, एनईएफटी व आरटीजीएस यांनी घेतली आहे. या आधुनिक बँकिंग व्यवस्थेशी जुळवून घेणे आणि आपले ज्ञान अद्यायावत ठेवणे हे आता सेवक, संचालक व सभासद या तीनही सहकारी बँकिंगमधील घटकांना जरूरीचे झाले आहे. यामुळेच 21 व्या शतकात प्रशिक्षणाची आवश्यकता, व्यवस्थापनाचा एक अविभाज्य आणि महत्त्वाचा घटक बनली आहे. म्हणून आज प्रशिक्षणाचे महत्त्व सहकारी संस्थांना पटले आहे.....( संपूर्ण लेख वाचण्यासाठी नोव्हेंबर २०२५ मासिकावर क्लिक करा )