पारंपरिक बँकिंग आणि वित्तीय तंत्रज्ञानाचे बदलते स्वरूप - श्री. अभिषेक गिर्हे
E-Magazine

पारंपरिक बँकिंग आणि वित्तीय तंत्रज्ञानाचे बदलते स्वरूप

- श्री. अभिषेक गिर्हे

AVIES PUBLICATION

सद्यःस्थितीत युपीआय आणि वित्तीय तंत्रज्ञान विकसित झाले असले तरी, अनेक लोक अजूनही बँकेत प्रत्यक्ष जाऊन व्यवहार करण्यास प्राधान्य देतात. याचे मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञानाविषयी असलेल्या जागरूकतेचा अभाव आणि डिजिटल व्यवहारांवरील अविश्वास. असे असले तरी, मोठ्या प्रमाणात लोक युपीआय आणि वित्तीय तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतात.

पारंपरिक बँकिंग व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे, कारण याद्वारे ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा प्रदान करता येते. यामुळे बँकेची जाहिरात होते व बँकेची विश्वासार्हता वाढते आणि बँकेच्या व्यवस्थापनाचा दर्जाही ग्राहकांच्या लक्षात येतो. सद्यस्थितीत युपीआय (UPI) आणि वित्तीय तंत्रज्ञान (FinTech) विकसित झाले असले तरी, अनेक लोक अजूनही बँकेत प्रत्यक्ष जाऊन व्यवहार करण्यास प्राधान्य देतात. याचे मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञानाविषयी असलेल्या जागरूकतेचा अभाव आणि डिजिटल व्यवहारांवरील अविश्वास. असे असले तरी, मोठ्या प्रमाणात लोक युपीआय आणि वित्तीय तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतात. मात्र, मोठी रक्कम हस्तांतरित करताना आजही युपीआय मर्यादांमुळे अक्षम ठरते. तसेच, सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता युपीआय वापरताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळे तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी पारंपरिक बँकिंगचे महत्त्व कमी होणार नाही...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी जानेवारी २०२६ मासिक पहा.)

SCROLL FOR NEXT