तारणी कर्जे : सुरक्षित (?) कर्जे श्री. श्रीकांत धुंडिराज जोशी, पुणे
E-Magazine

तारणी कर्जे : सुरक्षित (?) कर्जे

श्री. श्रीकांत धुंडिराज जोशी, पुणे

AVIES PUBLICATION

कर्ज देताना केवळ तारण मालमत्तेचा विचार करून चालणार नाही. कोणत्या कारणासाठी कर्ज दिले जात आहे, याचाही साकल्याने विचार व्हायला हवा. तारण तर हवेच हवे! पण त्याबरोबरच कर्जदाराचा प्रामाणिकपणा, निर्व्यसनीपणा, त्याच्या क्षमता / अक्षमता, व्यवसायातील अनुभव, कर्जदाराची बाजारातील पत (क्रेडिट) आदी गोष्टी विचारात घेऊन मगच कर्ज देण्याचा विचार करायला हवा.

बँका या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्या ठेवीदारांकडून ठेवी जमा करतात व व्यावसायिकांना, उद्योजकांना, उपभोक्त्यांना कर्जे देतात. हे मध्यस्थाचे काम! पण त्यामुळे पतपैशाची निर्मिती होत राहते. देशात चलन फिरते राहते. रोजगार निर्मिती साधते. अर्थचक्र गतिमान होते. बँकांना हे पक्के माहीत आहे की ज्यातून ही कर्जे दिली जातात, त्या रकमा त्यांच्या नव्हेत, ठेवीदारांच्या आहेत आणि म्हणूनच कर्जे देताना ती वेळच्या वेळी परत कशी येतील याची चिंता त्यांना करावी लागते. कर्जे म्हणजे सारा भविष्याचा खेळ! अन् भविष्य तर अनिश्चित! उद्या काय होईल हे आज कोणीच सांगू शकत नाही! आणि म्हणूनच बँका कर्जे देण्यापूर्वी कर्जदाराकडे तारण मागतात. कोणत्याही कारणाने, जर कर्ज थकलेच तर तारण ताब्यात घेऊन कर्ज वसूल करता येईल, हा त्या मागचा उद्देश! मात्र प्रत्येक कर्जास तारण असलेच पाहिजे, असे नव्हे. बँक, विनातारण कर्ज ही देऊ शकते. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प राहते. रिझर्व्ह बँकेने अशी विनातारणी कर्जे एकूण कर्ज-व्यवहारांच्या तुलनेत 10-15% च्या पलीकडे असू नयेत असे म्हटले आहे.....( संपूर्ण लेख वाचण्यासाठी डिसेंबर २०२५ मासिक पहा.)

SCROLL FOR NEXT