अल्पवयीन बालके  - श्रीकांत धुंडिराज जोशी, पुणे
E-Magazine

अल्पवयीन बालके आणि बँकिंग व्यवहार

- श्रीकांत धुंडिराज जोशी, पुणे

AVIES PUBLICATION

बँका सामाजिक सेवेत कार्यरत असतात. अर्थात समाजातील विविध घटकांशी नित्य सबंध येत राहतो. त्यापैकीच एक अल्पवयीन बालके (Minors), (वयाची अठरा वर्षे पूर्ण न केलेल्या व्यक्ती). यांनाच अज्ञान व्यक्ती अशीही संज्ञा आहे. बँकिंगमधील सर्वच व्यवहार कायद्याच्या भाषेत करार (Contract) या संज्ञेत येतात आणि करार केवळ आणि केवळ सज्ञान (वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती) व्यक्तीशीच करता येतात; अर्थातच अल्पवयीन व्यक्तीशी होणारे करार अर्थशून्य (Void) ठरतात. हे व्यवहार केवळ सहमती (Agreement) ठरतात. Contract मध्ये आणि असीशशाशपीं मध्ये मूलभूत अंतर असते.Contract असेल तर तंटा उदभवल्यास न्यायालयात जाता येते; तो अधिकार Agreement मध्ये नाही. त्यामुळे अज्ञान व्यक्तीविरुद्ध, बँकेस न्यायालयाची दारे बंद असतात. अर्थात या अज्ञान व्यक्तींशी होणारे व्यवहार अत्यंत सावध रीतीने करणे बँकांना भाग पडते. पण या अल्पवयीन बालकांना अगदी लहानपणापासूनच बँकिंगची ओळख होणे, त्यांना सवय लावणे समाजहिताचे असते. हे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने या बालकांशी होणार्‍या व्यवहारांना (काही विशिष्ट अटीं - शर्तींसह) उत्तेजन देण्याचे धोरण अवलंबले आहे.....( संपूर्ण लेख वाचण्यासाठी नोव्हेंबर २०२५ मासिकावर क्लिक करा )

SCROLL FOR NEXT