1969 मध्ये मी बँकिंग व्यवसायात पदार्पण केले. त्या गोष्टीस आता पन्नासहून अधिक वर्षे लोटलेली आहेत. या पन्नास वर्षांत, विशेषतः गेल्या वीस वर्षांत, बँकिंगमध्ये झपाट्याने परिवर्तने झाली आहेत; सातत्याने होत आहेत. या परिवर्तनाचा वेगही कल्पनातीत आहे. नव्या पिढीस या परिवर्तनाचे काहीच वाटत नाही. पण आमच्या जुन्या पिढीस मात्र या बदलाची अपूर्वाईच वाटते. आज या लेखमालिकेतून, मी आमच्या वेळच्या बँकिंगमधील काय हरवले आहे, याचा आढावा घेणार आहे. अर्थात आमच्या आधीच्या पिढीने आणखीही काही परिवर्तने पाहिली असतीलच.
आमच्या वेळचे बँकिंग पूर्णतः हाताने (Mannual) करण्याचे होते. यांत्रिक उपकरणांचा वापर केवळ टंकलेखन यंत्रापुरताच मर्यादित होता. दूरध्वनी होते; पण त्यांच्या वापरावरही खूपच मर्यादा होत्या. दळणवळणाची साधने अपुरी होती. त्यामुळे निर्णय घेताना अधिकार्यांच्या बुद्धीचा/ अनुभवाचा कस लागे. मानवी चुका फार होत; त्यामुळे अधिक सावधानतेने काम करावे लागे. एकाने केलेले काम दुसर्याने तपासून पाहणे भाग असे. आज या बेरीज/ वजाबाकी/ गुणाकार/ भागाकार यांच्या चुका होताना दिसत नाहीत. (पुढे जाण्यासाठी ऑगस्ट २०२५ मासिक वाचा.)