वैधानिक, प्रशासन सुधारणांनी पुरेसे संरक्षणात्मक उपाय निर्माण केले आहेत, असा रिझर्व्ह बँकेला विश्वास वाटू लागला व त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेने नवीन नागरी बँकांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला असा जाणकारांचा अंदाज आहे सारस्वत आणि कॉसमॉस यासारख्या नागरी सहकारी बँकांनी दाखवून दिले आहे की सुयोग्य व्यवस्थापन असलेल्या सहकारी बँका भरभराट करू शकतात आणि ठेवीदारांचे संरक्षण करण्यासाठी कमकुवत सहकारी संस्थांनाही सामावून घेऊ शकतात. यामागचे गमक व्यावसायिक व्यवस्थापन, राजकीय हस्तक्षेपापासून अलिप्तता आणि मजबूत प्रशासन चौकट हेच राहिले आहे....(संपूर्ण लेख वाचण्यासाठी सप्टेंबर २०२६ मासिक पहा.)