आपल्याकडे प्राचीन काळी जसे व्यवहार सुरू झाले तसे ते प्रथम सोन्या-चांदीच्या देवाणघेवाणीतून व्हायचे. नंतर यात वाढ व प्रगती होत गेली तशी पैशांची निर्मिती झाली आणि पैसे सुरक्षित ठेवणे व कर्ज व्यवहार करणे आदी कामांसाठी बँका निर्माण झाल्या. अलीकडे तर व्यवहार करताना बँकांना रोख रकमेची, चेकबुकची सुद्धा गरज भासत नाही. बँकिंग आता एका क्लिकवर साध्य झालेले आहे. हा बँकेच्या स्थित्यंतराचा प्रवास एका निष्ठावान बँकरने आपल्या मनोगतातून येथे रंजक पद्धतीने सादर केलेला आहे.
बँकिंगचा इतिहास : कौटिल्याच्या अर्थशास्त्रात कर्ज, व्याज आणि कर व्यवस्थेचा स्पष्ट उल्लेख आहे. प्राचीन भारतातील श्रेणी आणि गिल्ड्स या संस्था आधुनिक बँकिंगच्या मूळ कल्पना होत्या.(पुढे जाण्यासाठी ऑगस्ट २०२५ मासिक वाचा.)