सोने तारण कर्ज व्यवहार किती असावा याचे बँकांना प्रकटीकरण द्यावे लागणार आहे. तसेच कर्जदारांनाही परतफेडीची सक्षमता कागदोपत्री सिद्ध करावी लागणार आहे. त्यामुळे कर्जदार बँकेला कितपत सहकार्य करतील हा प्रश्नच आहे. मात्र, या व्यवहारांमध्ये आरबीआयने सर्व बँकांना लागू केलेले नवे निकष व निर्देश पतसंस्थांच्या बाबतीत सध्यातरी लागू नाहीत. त्यामुळे सोन्याच्या वजनावर महत्तम मर्यादा ठरणार नसल्याने विशेषतः मोठ्या पतसंस्थांना सोने तारण कर्ज व्यवहारांचा लाभ घेतील. (पुढे जाण्यासाठी जुलै २०२५ मासिक वाचा)