E-Magazine

सहकारी संस्थांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ताचे भविष्यातील उपयोग

लेखक - विश्वास लिलावती जयदेव ठाकूर, संस्थापक अध्यक्ष, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक.

AVIES PUBLICATION

‘एआय’मुळे बँकांच्या कार्यक्षमतेत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. डाटा एन्ट्रीचे नियमित काम तसेच फसवेगिरीपासून तत्काळ संरक्षण एआयमुळे मिळू शकते. त्यामुळे बँकांच्या प्रशासकीय खर्चात बचत होऊ शकते. ‘एआय’ संचालित चॅटबॉट २४ तास ग्राहकांना सेवा देऊ शकतो. बँकांच्या ग्राहकांचा तपशीलवार डेटा उपलब्ध असल्यामुळे अनुचित व्यवहार तत्काळ लक्षात येऊ शकतात. बँकेसाठी आणि बँकेच्या ग्राहकांसाठी तयार केलेले अल्गोरिदम यासाठी उपयुक्त ठरते. पतमानांकन करणे, शेअर बाजाराशी संबंधित व्यवहार करणे, गुंतवणूक सल्ला देणे इत्यादीबाबत ‘एआय’ मदत करू शकते. बँकेची कोणती सेवा ग्राहकांसाठी उपयुक्त आहे हे ग्राहकांच्या मतांवरून, गुणांकन पद्धतीवरून ‘एआय’ सांगू शकते. थोडक्यात, बँकेच्या कामकाजात सुव्यवस्था आणणे, धोका कमी करणे, उपयुक्त सेवांबद्दल बँकांना माहिती देणे या प्रकारचे काम ‘एआय’ करू शकते. (विस्तृत माहितीसाठी वर्धापन विशेषांक - मे - जुन २०२५ मासिक वाचा)

SCROLL FOR NEXT