युनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणाली (युपीआय) नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)) यांनी एप्रिल, २०१६ मध्ये भारतात लागू केली. यामुळे किरकोळ पेमेंट तत्काळ (रिअल टाईम) करणे सोपे झाले. मोबाईलमधून एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पैसे पाठविणे (आरटीजीस) एनइएफटीसारखे व खरेदी केलेल्या मालासाठी/सेवेसाठी तत्काळ भूगतान करण्याचे पूर्ण परिवर्तन आता करता आले. अशाच प्रकारची प्रणाली कर्जछाननी व मंजुरी तत्काळ करण्यासाठीचा विषय एनपीसीआयच्या विचाराधीन होता. कर्जाच्या जोखमींचा सर्वांगीण अभ्यास करून त्वरित कर्ज, सहज, सुलभ व तत्काळ कसे मंजूर व वितरीत होईल याचे एक अॅप ‘युनिफाईड लेंडिंग इंटरफेस’ (ULI) विकसित करण्यात आले व भारतात १० ऑगस्ट, २०२३ ला त्याचा प्रारंभ रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर श्री. शक्तिकांता दास यांनी केला यामुळे भारताची डिजिटल मूलभूत सेवांच्या परिवर्तनाचा प्रवास सुरू झाला. (विस्तृत माहितीसाठी एप्रिल २०२५ मासिक वाचा)