हवामान बदलाशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी बँका ठराविक कालावधीसाठी हरित ठेवी स्वीकारतात; या ठेवींचा वापर हवामान बदलाशी संबंधित हरित वित्तपुरवठ्यासाठी केला जातो. बँकांनी हरित ठेव योजना सुरू केल्या आहेत. उदा.-भारतीय स्टेट बँक (SBI) ने ठेवी उभारण्यासाठी ‘SBI’ ‘ग्रीन रुपी’ ‘टर्म डिपॉझिट’ सादर केली आहे. बँकांमध्ये हरित ठेवींबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे, ज्यामुळे किरकोळ ग्राहक, कंपन्या, न्यास आणि उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्तींकडून हरित ठेवींमध्ये व्यापक सहभाग मिळेल व त्या हरित ठेवी निधीचा प्रमुख स्रोत ठरतील. या दिशेने, अजून खूप पल्ला गाठायचा आहे...(संपूर्ण लेख वाचण्यासाठी सप्टेंबर २०२६ मासिक पहा.)