अनेक कामे अशी असतात जी वारंवार करावी लागतात ज्याला आपण वर्क डुप्लिकेशन असे म्हणतो. यामध्ये कर्मचार्यांचा अधिक वेळ जातो. ग्राहक सेवेबरोबरच AI आणि ML वित्तीय संस्थांच्या कार्यक्षमतेत आणि सुरक्षिततेत लक्षणीय वाढ करतात. अनेक नियमित आणि पुनरावृत्तीची कामे, जसे की डेटा एंट्री, अहवाल तयार करणे, खात्यांची पडताळणी किंवा देयके तपासणे AI मुळे स्वयंचलित करता येतात.
सहकारी पतसंस्था व बँकेत आजही आपण CBS प्रणालीमधील अडचणी दूर करण्याचा व ती अद्ययावत करण्याकरिता प्रयत्न करीत आहोत. असे असताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) असे तंत्रज्ञान बँकिंग क्षेतात वेगाने शिरकाव करून ग्राहकांना आधुनिक बँकिंगकडे घेऊन जात आहे. ग्राहकांच्या बँकेकडून असलेल्या अपेक्षेपेक्षा अधिक सोपी थोडक्यात हायपर-पर्सनलाइज बँकिंगचा अनुभव हे तंत्रज्ञान ग्राहकांना करून देत आहेत. सहकारात आपल्याला या तंत्रज्ञानाचा विचार एवढ्या लवकर करण्याची गरज आहे का? तर याचे उत्तर निश्चितच हो असे आहे परंतु ते अधिक विस्तृतरीत्या समजावून घेण्याआधी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) नेमके काय आहे ते समजून घेऊयात......(संपूर्ण लेख वाचण्यासाठी जानेवारी २०२६ मासिक पहा.)