बँकिंग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, हे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने ठेव विमा महामंडळामार्फत पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देऊ केले आहे. आता तर बँक बुडण्याचीही वाट न पाहता, संबंधित बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले की लगेच विमा महामंडळ ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यास पुढे येते. त्यामुळे संख्येने सर्वाधिक असणार्या छोट्या ठेवीदारांच्या हिताचे रक्षण होते.
बचतदारांना आज बँकेखेरीज बचत ठेवींच्या अनेकविध योजना उपलब्ध आहेत. पण आजही सर्वात जास्त लोकप्रिय आहेत त्या बँकेतील मुदत ठेवीच! खरे पाहता, बँकेचे ठेवीदार बँकेचे ऋणको होत. ठेवीदारांनी बँकेस कर्ज दिलेले असते. पण ठेवीदारांकडून घेतलेल्या या कर्जासाठी बँक कोणतेही तारण देत नाही. दुसर्या शब्दात ठेवीदारांनी दिलेली ही कर्जे विनातारणी असतात. बँक बुडल्यास ठेवीदारांचेही नुकसान संभवते. बँकांकडे ठेवीदार आकर्षित होतात कारण ठेवीदारांच्या दृष्टीने बँकेच्या शाखा सहजरीत्या जवळच असतात; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे कारण म्हणजे बँकांवर असणारा जनसामान्यांचा प्रचंड विश्वास! हा विश्वास अढळ राहावा, तो वाढता राहावा म्हणून रिझर्व्ह बँक अतिशय जागरूक असते....(संपूर्ण लेख वाचण्यासाठी जानेवारी २०२६ मासिक पहा.)