कर्ज वितरण, वसुली : समस्या आणि उपाय  
E-Magazine

कर्ज वितरण, वसुली : समस्या आणि उपाय

श्री. श्रीकांत धुंडिराज जोशी

AVIES PUBLICATION

कर्जाची मागणी त्याच्या व्यावसायिक आवश्यकता पुरेशा भागवणारी आहे ना? ना कमी ना जास्त! व्यवसायाकरिता आवश्यक त्या मालमत्तेच्या उभारणीसाठी मुदत कर्जाची आवश्यकता असते; या शिवाय खेळते भांडवल जरुरीचे असते; दोन्हींचा समतोल विचार केला आहे ना?

वेळेवर कर्ज वसुली महत्त्वाची का?

  • ठेवीदारांचे हित जपण्यासाठी; त्यांच्या जीवावरच बँकिंग चालते.

  • बँकेवरील व बँकिंगवरील जनतेचा विश्वास वाढावा म्हणून. या विश्वासामुळेच देशाची अर्थव्यवस्था अधिक कणखर होते.

  • बँकेचा कर्ज व्यवहारांतील आत्मविश्वास वाढतो.

  • संस्था नफ्यात राहावी म्हणून अन्यथा अनुत्पादक

  • मालमत्तेचे प्रमाण वाढून संस्थेच्या अस्तित्वालाच आव्हान मिळेल.

  • कर्ज वसुली वेळेवर झाल्यास नवी कर्जे देण्यास निधी उपलब्ध होत राहतो.

  • कर्ज वसुली प्रक्रिया सुरू होते - कर्ज थकू लागल्यावर नव्हे, तर कर्ज देण्यापूर्वी! म्हणून कर्ज देण्यापूर्वीच तपासून पाहा!

  • विचाराधीन कर्ज प्रस्ताव बँकेच्या कर्ज धोरणाशी सुसंगत आहे ना?

  • रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांशी विसंगत नाही ना?

  • सामाजिक हिताशी संघर्ष नाही ना?

  • कर्जदार व जामीनदार यांचे आपल्या ग्राहकास जाणा या संकल्पनेचे सर्व निकष पुरे होत आहेत ना?

  • अर्जदाराची पार्श्वभूमी अपराधिक नाही ना? तो समाजात अपकीर्त नाही ना?....(संपूर्ण लेख वाचण्यासाठी फेब्रुवारी २०२६ मासिक पहा.)

SCROLL FOR NEXT