आरबीआयकडून केवायसी (KYC) अद्ययावत धोरणात महत्त्वपूर्ण बदल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
Circular

रिझर्व्ह बँकेच्या केवायसी धोरणात बदल

ग्राहकांना मिळणार सवलती

Reva Kulkarni

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने "Know Your Customer (KYC) निर्देश, 2016" मध्ये सुधारणा करत एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. ग्राहक सेवा सुधारण्याच्या दृष्टीने यामध्ये काही महत्त्वपूर्ण तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

 सुधारणांचे ठळक मुद्दे

  कमी जोखीम वर्गातील ग्राहकांना सवलत

  • अशा खात्यांमध्ये केवायसी अद्ययावत होण्याची वेळ आली असतानाही, व्यवहार सुरू ठेवता येतील.

  • केवायसी नूतनीकरणाची अंतिम तारीख म्हणजे ज्यावेळी ती पूर्ण करणे अपेक्षित आहे अथवा ३० जून २०२६, यापैकी जी उशिरा आहे ती ग्राह्य धरली जाईल.

  • मात्र, अशा खात्यांवर नियमित देखरेख/मॉनिटरिंग बंधनकारक असेल.

 

Reserve Bank of India Know Your Customer KYC Amendment Directions 2025.pdf
Preview

 बिझनेस करस्पाँडन्ट (BC) द्वारे KYC नूतनीकरण अधिकृत

  • ग्राहक “केवायसीमध्ये कोणताही बदल नाही” किंवा “फक्त पत्त्यात बदल आहे” अशा स्वघोषणा BC कडून देऊ शकतात.

  • बँकांनी आपली BC प्रणाली इलेक्ट्रॉनिक स्वरूपात नोंदवण्यासाठी सक्षम करावी.

  • बायोमेट्रिक e-KYC नंतर BC कडून माहिती व पुरावे संकलित करता येतील.

  • ग्राहकास स्वीकृतीचे पावतीपत्र देणे बंधनकारक आहे.

SCROLL FOR NEXT