सिम क्लोनिंग आणि ई-सिम फसवणुकीला बसणार कायमचा लगाम; १ एप्रिलपासून मोठे बदल 
Arth Warta

बँक खात्यातून पैसे गायब होण्याचे दिवस आता संपणार! पाहा काय आहे सायलेंट ऑथेंटिकेशन?

OTP चे टेन्शन विसरा; सिम कार्ड बदलताच बँक व्यवहार होणार ब्लॉक, सायबर फसवणुकीला बसणार लगाम

Prachi Tadakhe

मुंबई: बँकिंग क्षेत्रातील वाढती डिजिटल फसवणूक आणि 'सिम क्लोनिंग' सारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आता एक नवे तंत्रज्ञान येत आहे. देशातील आघाडीच्या बँका आणि टेलिकॉम कंपन्या मिळून 'सायलेंट ऑथेंटिकेशन' (Silent Authentication) या प्रणालीवर काम करत आहेत. यामुळे आता वारंवार येणाऱ्या ओटीपीची (OTP) गरज भासणार नाही, तर बॅकग्राउंडमध्येच तुमच्या सिमची पडताळणी केली जाईल.

काय आहे हे नवे तंत्रज्ञान?

अनेकदा फसवणूक करणारे तुमचे सिम क्लोन करतात किंवा ई-सिम (eSIM) चोरून तुमच्या खात्यातील पैसे लंपास करतात. नव्या तंत्रज्ञानामुळे, तुम्ही जेव्हा बँकेचे अ‍ॅप वापराल, तेव्हा बँक आणि टेलिकॉम कंपनी आपोआप तपासतील की तुमच्या फोनमध्ये तेच सिम कार्ड आहे का जे बँकेत नोंदणीकृत आहे. जर यामध्ये काहीही तफावत आढळली, तर तुमचे बँक खाते किंवा तो व्यवहार तातडीने सुरक्षिततेसाठी ब्लॉक केला जाईल.

ग्राहकांसाठी याचे फायदे:

  • ओटीपीची कटकट नाही: व्यवहार करताना वारंवार ओटीपी टाकण्याची गरज कमी होईल.

  • सिम क्लोनिंगला लगाम: तुमचे सिम कार्ड चोरून किंवा बदलून कोणीही व्यवहार करू शकणार नाही.

  • अतिरिक्त सुरक्षा: हे तंत्रज्ञान ई-सिमवरही प्रभावीपणे काम करेल, ज्यामुळे डिजिटल फसवणूक रोखणे सोपे होईल.

रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांनुसार, डिजिटल व्यवहारांसाठी अधिक सुरक्षित यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे. त्यादृष्टीने 'सायलेंट ऑथेंटिकेशन' हा एक मोठा बदल ठरणार आहे.

SCROLL FOR NEXT