भारतीय स्टेट बँकेत (SBI) विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; असा करा अर्ज 
Arth Warta

SBI मध्ये बँक अधिकारी पदांसाठी नोकरीची मोठी संधी!

२३ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या पात्रता आणि पदांचा सविस्तर तपशील.

Prachi Tadakhe

मुंबई: भारतीय स्टेट बँकेने (SBI) नियमित आधारावर विविध विशेषज्ञ संवर्ग अधिकारी (Specialist Cadre Officer) पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. केंद्रीय भर्ती व पदोन्नती विभाग, कॉर्पोरेट सेंटर, मुंबई यांच्यामार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, इच्छुक आणि पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद व रिक्त जागांचा तपशील:

या भरती मोहिमेत दोन वेगवेगळ्या जाहिरात क्रमांकांतर्गत पदे भरली जाणार आहेत:

१. जाहिरात क्र.: CRPD/SCO/२०२६-२७/२६ (नियमित पदे)

  • मुख्य व्यवस्थापक (उत्पादन व संशोधन-फॉरेक्स आणि रुपी डेरिहेट्टिव्ह्ज): १ जागा (श्रेणी: एसएमजीएस-IV, कमाल वय ३०.०९.२०२६ रोजी ४० वर्षांपर्यंत)

  • व्यवस्थापक (उत्पादन आणि संशोधन-विश्लेशक): ६ जागा (श्रेणी: एमएमजीएस-III, कमाल वय: ३६ वर्षे)

२. जाहिरात क्र.: CRPD/SCO/२०२६-२७/२७ (नियमित पदे)

  • डेप्युटी मॅनेजर (रिस्क स्पेशालिस्ट- Ind AS): ३ जागा (श्रेणी: एमएमजीएस-II, कमाल वय: ३५ वर्षे)

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्यास व शुल्क भरण्यास सुरुवात: ०२ नोव्हेंबर २०२६

  • ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याची अंतिम तारीख: २३ नोव्हेंबर २०२६

पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • पात्रता निकष: वयोमर्यादा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, नोकरीचे तपशील आणि शुल्काची सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

  • अधिकृत संकेतस्थळ: उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी बँकेच्या (https://sbi.bank.in/web/careers/current-openings) या लिंकला भेट द्यावी.

मार्गदर्शक सूचना: ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी आणि शुल्क भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपली पात्रता सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

शंका किंवा अडचण असल्यास: अर्ज करताना किंवा इतर तांत्रिक बाबींमध्ये काही शंका असल्यास, उमेदवार बँकेच्या वेबसाइटवरील "CONTACT US" --->> "Post Your Query" (https://sbi.bank.in/web/careers/postyour-query) या लिंकद्वारे आपले प्रश्न विचारू शकतात.

SCROLL FOR NEXT