स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत 
Arth Warta

SBI Recruitment 2026: 'स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर' पदांसाठी मोठी भरती सुरू

डिजिटल मार्केटिंग, सेल्स आणि आयटी क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांना संधी; २१ ऑक्टोबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज.

Prachi Tadakhe

मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 'स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर' (Specialist Cadre Officers - SCO) पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर (Contract Basis) भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत विविध महत्त्वाच्या विभागांमधील कुशल अधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.

विविध पदांचा तपशील व वयोमर्यादा:

बँकेने जारी केलेल्या दोन वेगवेगळ्या जाहिरातींनुसार (Advertisement No. CRPD/SCO/2026-27/24 आणि 25) खालील पदांवर भरती केली जाणार आहे:

1. डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट (Analytical Marketing & Campaign): १ जागा (वयोमर्यादा: ३३ ते ४५ वर्षे)

2. डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट (Digital Marketing): २ जागा (वयोमर्यादा: ३३ ते ४५ वर्षे)

3. कंटेंट स्पेशालिस्ट (Content Specialist): १ जागा (वयोमर्यादा: २५ ते ४० वर्षे)

1. हेड सेल्स (Head Sales): १ जागा (वयोमर्यादा: ४० ते ५२ वर्षे)

2. सेंट्रल रिसर्च टीम - प्रॉडक्ट लीड (Product Lead): २ जागा (वयोमर्यादा: ३० ते ४५ वर्षे)

3. मॅनेजर - बिझनेस प्रोसेस (Business Process): १ जागा (वयोमर्यादा: ३० ते ४० वर्षे)

4. प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर - तंत्रज्ञान (Technology): १ जागा (वयोमर्यादा: २५ ते ४० वर्षे)

5. सेंट्रल ऑपरेशन्स टीम (COT Support): १ जागा (वयोमर्यादा: ३० ते ४० वर्षे)

(टीप: वयोमर्यादेची गणना ३१ जुलै २०२६ या तारखेनुसार केली जाईल.)

उमेदवारांना ३० सप्टेंबर २०२६ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत

अर्ज भरण्यासाठी आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी SBI च्या अधिकृत भरती पोर्टल (https://sbi.bank.in/web/careers/current-openings) ला भेट द्यावी.

उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी तसेच फी जमा करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि जॉब प्रोफाइलची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये व्यवस्थित वाचून घ्यावी, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.

काही अडचण किंवा प्रश्न असल्यास:

भरती प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही शंका किंवा प्रश्नांसाठी उमेदवार बँकेच्या (https://sbi.bank.in/web/careers/post-your-query) या लिंकवर जाऊन ("CONTACT US" ----> "Post Your Query") थेट प्रश्न विचारू शकतात.

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज आणि फी भरण्याची सुरुवात: ३० सप्टेंबर २०२६

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २१ ऑक्टोबर २०२६

SCROLL FOR NEXT