रिझर्व्ह बँकेने OTC डेरिव्हेटिव्ह करारांच्या नोव्हेशनसंदर्भातील मसुदा निर्देश 9 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध केला होता. त्यावर प्राप्त झालेल्या अभिप्रायांचा विचार करून अंतिम सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत. या सूचना OTC परकीय चलन, व्याजदर, सरकारी रोखे आणि क्रेडिट डेरिव्हेटिव्ह करारांसाठी लागू असलेल्या संबंधित मास्टर डायरेक्शन्समध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
OTC डेरिव्हेटिव्ह व्यवहारातील विद्यमान पक्षाऐवजी दुसऱ्या पक्षाला करारात सहभागी करून घेण्याची प्रक्रिया म्हणजे Novation. नव्या करारामध्ये विद्यमान पक्ष आणि तिसरा पक्ष यांच्यात नवीन करार केला जातो
नवीन निर्देश 22 सप्टेंबर 2026 रोजी किंवा त्यानंतर करण्यात येणाऱ्या नोव्हेशनला लागू राहतील. यामध्ये निर्देश जारी झाल्याच्या दिवशी अस्तित्वात असलेल्या OTC डेरिव्हेटिव्ह करारांचे त्यानंतर केलेले नोव्हेशन तसेच त्यानंतर करण्यात आलेल्या नवीन OTC डेरिव्हेटिव्ह करारांचे नोव्हेशन यांचा समावेश आहे.
Central Counterparty (CCP) कडून OTC डेरिव्हेटिव्ह कराराच्या settlement साठी केलेल्या नोव्हेशनला हे निर्देश लागू होणार नाहीत. मात्र, CCP कडून settlement साठी स्वीकारलेल्या कराराचे त्यानंतरचे नोव्हेशन या निर्देशांनुसार करावे लागेल.
तसेच merger, demerger किंवा amalgamation योजनेअंतर्गत होणाऱ्या नोव्हेशनसाठी 9 डिसेंबर 2013 च्या संबंधित RBI परिपत्रकानुसार प्रक्रिया सुरू राहील.
रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की OTC डेरिव्हेटिव्ह व्यवहारातील किमान एका पक्षाची भूमिका Market Maker किंवा RBI कडून अधिकृत Central Counterparty यापैकी एकाची असणे आवश्यक आहे. त्यामुळे transferor आणि transferee हे दोन्ही ‘users’ असलेल्या नोव्हेशनला परवानगी देण्यात आलेली नाही.
नोव्हेशननंतर करारात कायम राहणाऱ्या पक्षाला ‘Remaining Party’ म्हटले आहे. RBI ने या व्याख्येत बदल करून Market Maker किंवा Central Counterparty देखील Remaining Party असू शकतो, असे स्पष्ट केले आहे.
Anonymous platform वर व्यवहार होत असल्यास आणि CCP हा Remaining Party असल्यास, नोव्हेशनची प्रक्रिया संबंधित CCP ने निश्चित केलेल्या पद्धतीनुसार करावी लागेल.
नोव्हेशनच्या दिवशी प्रचलित बाजारभावानुसार OTC डेरिव्हेटिव्ह कराराचे Mark-to-Market (MTM) मूल्य निश्चित केले जाईल. RBI ने स्पष्ट केले आहे की ही रक्कम transferor आणि transferee यांच्यात upfront, म्हणजेच तत्काळ देवाणघेवाण करावी लागेल; ती maturityपर्यंत पुढे ढकलता येणार नाही
OTC डेरिव्हेटिव्ह व्यवहार करणाऱ्या पात्र बाजार सहभागींसाठी नोव्हेशनची प्रक्रिया अधिक स्पष्ट झाली आहे. विशेषतः करारातील पक्ष बदल, CCP ची भूमिका, MTM सेटलमेंट आणि विद्यमान करारांच्या नोव्हेशनबाबत RBI ने स्पष्टता दिली आहे. अंतिम निर्देश जारी झाल्याच्या तारखेपासून होणाऱ्या नोव्हेशनवर हे नियम लागू राहतील.