मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑफिस अटेंडंट (Office Attendant – Panel Year 2025) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. देशभरातील विविध कार्यालयांसाठी एकूण 572 रिक्त पदे भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती स्पर्धा परीक्षा आणि भाषा प्रावीण्य चाचणीद्वारे केली जाणार आहे.
ऑनलाइन अर्ज सुरू : 15 जानेवारी 2026
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 4 फेब्रुवारी 2026
ऑनलाइन परीक्षा (संभाव्य) : 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026
ही पदे अहमदाबाद, मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, जयपूर, पटना, गुवाहाटी, कानपूर-लखनऊ आदी RBI च्या विविध प्रादेशिक कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. SC, ST, OBC, EWS, दिव्यांग (PwBD) व माजी सैनिकांसाठी आरक्षण लागू राहणार आहे.
उमेदवार 10वी (SSC/मॅट्रिक) उत्तीर्ण असणे आवश्यक
पदवीधर उमेदवार अपात्र ठरणार आहेत
अर्ज करणाऱ्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाची स्थानिक भाषा वाचता, लिहिता व बोलता येणे आवश्यक
किमान वय : 18 वर्षे
कमाल वय : 25 वर्षे
आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार
भरती प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे:
ऑनलाइन लेखी परीक्षा
Reasoning – 30 प्रश्न
General English – 30 प्रश्न
General Awareness – 30 प्रश्न
Numerical Ability – 30 प्रश्न
एकूण : 120 प्रश्न | 120 गुण
परीक्षेला नकारात्मक गुणांकन लागू
भाषा प्रावीण्य चाचणी (LPT)
संबंधित राज्याच्या अधिकृत/स्थानिक भाषेत
ही चाचणी केवळ पात्रता स्वरूपाची असेल
प्रारंभिक मूळ वेतन : ₹24,250/-
एकूण मासिक वेतन (ग्रॉस) अंदाजे ₹46,000/-
घरभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा, एलटीसी, पेन्शन योजना, विमा इत्यादी लाभ मिळणार
SC/ST/PwBD/माजी सैनिक : ₹50 + GST
GEN/OBC/EWS : ₹450 + GST
उमेदवारांनी फक्त RBI च्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अन्य कोणतीही अर्ज पद्धत स्वीकारली जाणार नाही.
अर्ज लिंक : https://ibpsreg.ibps.in/rbipodec25/
परीक्षा केंद्रावर मोबाईल, कॅल्क्युलेटर व इलेक्ट्रॉनिक उपकरणे पूर्णतः बंदीस्त
चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द केली जाईल
रिझर्व्ह बँकेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या 10वी उत्तीर्ण तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. स्थिर नोकरी, आकर्षक वेतन आणि प्रतिष्ठित संस्था यामुळे या भरतीकडे उमेदवारांचे विशेष लक्ष लागले आहे.