मुंबई: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India - RBI) ग्रेड 'बी' (Grade 'B' Officer) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ६० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: २९ एप्रिल २०२६
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० मे २०२६
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख: २० मे २०२६
पूर्व परीक्षा (Phase I Exam): जून २०२६ (अंदाजित)
मुख्य परीक्षा (Phase II Exam): जुलै २०२६ (अंदाजित)
पद - ग्रेड 'बी' ऑफिसर (Grade 'B' Officer)
एकूण जागा - ६०
वयोमर्यादा (०१.०५.२०२६ रोजी ) - २१ ते ३० वर्षे (सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.)
शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (Degree). (SC/ST/PwBD उमेदवारांसाठी किमान ५५% गुण आवश्यक)
शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत खालीलप्रमाणे सूट देण्यात आली आहे:
SC / ST: ५ वर्षे सूट
OBC (NCL): ३ वर्षे सूट
PwBD (General): १० वर्षे सूट
PwBD (OBC): १३ वर्षे सूट
PwBD (SC/ST): १५ वर्षे सूट
या पदासाठी निवडक उमेदवारांना उत्तम वेतनश्रेणी मिळणार आहे.
मूळ वेतन (Basic Pay): ₹५५,२००/- दरमहा.
वेतनश्रेणी: ₹५५,२०० - ₹९९,७५०/- (Level 10)
याशिवाय नियमांनुसार डीए (DA), एचआरए (HRA), सीसीए (CCA) आणि इतर भत्ते देखील लागू राहतील.
उमेदवारांची निवड तीन टप्प्यांच्या आधारे केली जाईल:
फेज-१ (Phase I): ऑनलाईन परीक्षा (पूर्व परीक्षा)
फेज-२ (Phase II): ऑनलाईन परीक्षा (मुख्य परीक्षा)
फेज-३ (Phase III): मुलाखत (Interview)
(अंतिम गुणवत्ता यादी फेज-२ आणि मुलाखतीमधील कामगिरीच्या आधारे तयार केली जाईल).
General / OBC / EWS: ₹८५०/-
SC / ST / PwBD: ₹१००/-
(शुल्क भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाईन करता येईल.)
इच्छुक उमेदवारांना रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अन्य कोणत्याही मार्गाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अधिकृत संकेतस्थळ: www.rbi.org.in
अर्ज करण्याची मुदत: २९ एप्रिल २०२६ ते २० मे २०२६ पर्यंत.