ऑनलाईन आणि ईमेलद्वारे अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर; त्वरित अर्ज करा. 
Arth Warta

राजगुरुनगर सहकारी बँक नोकरी २०२६: सहकार क्षेत्रात करिअरची संधी!

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया.

Prachi Tadakhe

पुणे : राजगुरुनगर सहकारी बँकेच्या वतीने विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याद्वारे बँकेच्या विविध पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

कोणत्या पदांसाठी आहे भरती?

या भरती मोहिमेत प्रामुख्याने खालील पदांचा समावेश आहे:

१) लेखनिक (Junior Officer)

२) सहा. शाखाव्यवस्थापक (Asst. Branch Manager) / सहा. व्यवस्थापक आयटी (Asst. Manager - IT)

३) आय टी ऑपरेटर (IT Operator)

अर्ज प्रक्रिया आणि पात्रता:

  • लेखनिक आणि व्यवस्थापकीय पदांच्या (पदे १ व २) भरतीकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक उमेदवारांनी (https://ibpsreg.ibps.in/rsblrsep26/) या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

  1. आय टी ऑपरेटर (पद ३) या पदाकरिता उमेदवारांनी आपले अर्ज थेट बँकेच्या मेल आयडीवर पाठवणे गरजेचे आहे.

  2. या सर्व पदांच्या भरतीसंदर्भातील शैक्षणिक पात्रता, नियम आणि अधिक तपशिलासाठी उमेदवारांनी बँकेच्या www.rajgurunagar.bank.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

अंतिम मुदत:

सर्व संबंधित पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२६ ही ठरविण्यात आली आहे. इच्छुकांनी मुदतीपूर्वी आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन बँकेच्या मुख्य कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

बँकेचा पत्ता व संपर्क:

  • मुख्य कार्यालय: स.नं. ३१९/३२०, पुणे-नाशिक महामार्ग, राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे - ४१०५०५.

  • फोन नंबर: ०२१३५-२२२०८५.

  • ईमेल: rsbl@rajgurunagar.bank.in

SCROLL FOR NEXT