व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था  व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था
Co-op Credit Societies

व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदांना १२% लाभांश

३६ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

Pratap Patil

कोल्हापूर येथील व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष भरत घोडके यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी अध्यक्ष घोडके म्हणाले की, "या आर्थिक वर्षात संस्थेला ४७.०५ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. ऑडिटमध्ये 'अ' वर्ग मिळालेला असून, संस्थेने आपल्या सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर केलेला आहे."

सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सभासद सुरेश तेलंग व रघुनाथ निगुडकर यांचा सत्कार करण्यात आला. सभेस संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT