नागपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात 'स्वयमशक्ती'चे निर्विवाद वर्चस्व 
Co-op Credit Societies

१०३ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार; स्वयमशक्ती क्रेडीट को-ऑप सोसायटीची उल्लेखनीय प्रगती

६१ कोटींच्या ठेवी आणि ९० लाखांचा नफा; सभासदांचा विश्वास अधोरेखित.

Prachi Tadakhe

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील एक अग्रगण्य वित्तीय संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'स्वयमशक्ती क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड' ने ३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. संस्थेने १०३ कोटी रुपयांचा एकूण संमिश्र व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे गाठला असून, ही संस्थेच्या इतिहासातील एक मोठी 'आर्थिक भरारी' मानली जात आहे.

आर्थिक स्थितीचा आढावा (३१ मार्च २०२६ अखेर):

संस्थेने पारदर्शक कारभार आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर सर्वच क्षेत्रांत वाढ नोंदवली आहे. जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार:

  • एकूण ठेवी: ६१ कोटी ०५ लाख रुपये

  • कर्ज वितरण: ४२ कोटी ०२ लाख रुपये

  • गुंतवणूक: २१ कोटी ४३ लाख रुपये

  • भाग भांडवल: १ कोटी ६६ लाख रुपये

  • निव्वळ नफा: ९० लाख रुपये

  • राखीव व इतर निधी: ६५ लाख ०३ हजार रुपये

विश्वासाच्या जोरावर प्रगतीचा आलेख

संस्थेचा एकूण संमिश्र व्यवसाय १०३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सभासद आणि ग्राहकांच्या निरंतर पाठिंब्यामुळेच हे यश साध्य करणे शक्य झाले आहे. संस्थेने आपल्या ठेवीदारांच्या गुंतवणुकीला सुरक्षितता देतानाच कर्ज वितरणाद्वारे अनेकांना आर्थिक आधारही दिला आहे.

अध्यक्षांचे आभार आणि आवाहन

या यशाबद्दल बोलताना संस्थेचे अध्यक्ष मा. अनिल प्रभाकर गोमकाळे म्हणाले की, "स्वयमशक्ती सोसायटी ही केवळ एक संस्था नसून सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळेच आम्ही आज हा टप्पा गाठू शकलो. भविष्यातही अशाच प्रकारे अत्याधुनिक सेवा आणि पारदर्शकतेच्या जोरावर संस्थेचा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे."

स्वयमशक्ती सोसायटीने आपल्या खापरखेडा, कोराडी, झिंगाबाई टाकळी, पारशिवनी आणि कन्हान या शाखांच्या माध्यमातून ग्रामीण व निमशहरी भागात आपले भक्कम जाळे विणले आहे. "तुमच्या गुंतवणुकीला आम्ही जपू... तुम्ही तुमचे आरोग्य जपा..." हे ब्रीदवाक्य समोर ठेवून संस्था सामाजिक बांधीलकीही जपत आहे.

SCROLL FOR NEXT