Co-op Credit Societies

स्वस्तिक कोळसा खदान कामगार सहकारी पतसंस्थेतर्फे शिष्यवृत्तीसाठी आवाहन

सभासदांच्या मुलांना देणार "शैक्षणिक प्रोत्साहनपर रक्कम"

Pratap Patil

स्वस्तिक कोळसा खदान कामगार सहकारी पत संस्था मर्या., सावनेर प्रकल्पाच्या (नोंदणी क्र. १०२६) येथील सर्व सभासदांना कळविण्यात येते की, संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे ज्या सभासदांच्या मुलांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये १० वीच्या परीक्षेत ७५% किंवा त्यापेक्षा जास्त, किंवा १२ वीच्या परीक्षेत ७०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेले आहेत, अशा सर्व सभासदांच्या मुलांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने "शैक्षणिक प्रोत्साहनपर पुरस्कार रक्कम" वितरित करण्यात येणार आहे.

त्यासाठी सर्व सभासदांना विनंती करण्यात येते की, आपल्या मुलांचे वरील शैक्षणिक वर्षातील १० वी किंवा १२ वीच्या परीक्षेचे गुणपत्रक (झेरॉक्स) तसेच १ फोटो यांसह संस्थेतून अर्जाचा नमुना घेऊन, तो दिनांक ०९/०९/२०२५ पर्यंत संस्थेकडे जमा करावा,असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. विलास डी. चिचूलकर यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT