रत्नागिरी:"स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेची आर्थिक शिस्त व अर्थकारण राज्यात आदर्शवत आहे. या संस्थेच्या कामकाजात असलेले सातत्य, आर्थिक शिस्त आणि प्रमाणबद्धता इतर संस्थांना अनुकरणीय आहे," अशा शब्दांत राज्य सहकार संघाचे अध्यक्ष, पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी आज स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे कौतुक केले.
स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाला आमदार दरेकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी आमदार दरेकर यांनी संस्थेच्या व्यवहारांची माहिती घेतली. संस्थेची उत्तम वसुली, भक्कम स्वनिधी, निव्वळ नफा या प्रगतीबद्दल ॲड. दीपक पटवर्धन यांचे त्यांनी खास अभिनंदन केले.
कर्ज मर्यादा वाढ, पोटनियम दुरुस्त यासंदर्भाने असलेल्या अडचण समजावून घेऊन आमदार दरेकर यांनी थेट आयुक्तांबरोबर चर्चा करून संस्थेच्या मागण्या मान्य कराव्यात, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
या सत्काराप्रसंगी उपाध्यक्ष माधन गोगटे, संचालक अजित रानडे, लेले यांच्यासह मुन्ना चवंडे, सचिन करमरकर, राजू तोहणक हेही यावेळी उपस्थित होते.